महाराष्ट्रातील या जिल्ह्यात सलग दोन दिवसात उष्मांघाताने दोन जणांचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगरातील सोयगाव सह तालुक्यात तापमानाने कहर केला आहे शनिवारी (ता.२५)दुपारी १७ वर्षीय युवतीचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना घोसला ता सोयगाव येथे घडली आहे सायंकाळी चार वाजता तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे…
सुमन सर्जेराव पवार(वय १७) असे उष्मांघात मुळे मृत झालेल्या युवतीचे नाव आहे शुक्रवारी सदर युवती आई सोबत शेतात गेली होती शेतात तिने झाडाची सावली व ऊन्हात असे राहिल्या मुळे तिला शुक्रवारी सायंकाळी अत्यवस्थ वाटून उलट्या झाल्या होत्या रात्री झोपल्या वर शनिवारी सकाळी तीचा झोपत च मृत्यू झाला शनिवारी सकाळी सदर युवती उठलीच नाही तिला तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले असता खासगी वैद्यकीय सूत्रांनी तिला तपासून मृत घोषित केले शनिवारी दुपारी चार वाजता तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे सोयगाव तालुक्यात आठवडाभरापासून तापमानात वाढ झाली आहे त्यामुळे शुक्रवारी शेतातून घरी आलेल्या शेतकरी प्रकाश तराल(रा कवली) यांच्या पाठोपाठ शनिवारी घोसल्यात १७ वर्षीय युवतीचा उष्मांघात मुळे मृत्यू झाला आहे महसूल विभागाने या घटनेची नोंद केली असून तालुका आरोग्य विभागाचे पथक तातडीने घटनास्थळी सायंकाळी उशिरा घोसला येथे रवाना झाले होते दरम्यान सोयगाव तालुक्यात २४ तासात उष्मांघाताने सलग दुसरा मृत्यू झाला आहे शनिवारी मात्र सोयगाव चा पारा ४४ अंशावर होता त्यामुळे रस्ते सामसूम झाले तर गावागावात शुकशुकाट दिसून आला होता दरम्यान सोयगाव तालुक्यात दोन दिवसात उष्मांघात चा हा दुसरा बळी झाला आहे
कोट–सोयगाव तालुक्यातील घोसला गाव हे जळगाव जिल्ह्याच्या सीमेवर आहे त्यामुळे या गावात तापमानाची नोंद विक्रमी आहे सदर १७ वर्षीय युवतीचा मृत्यू हा नेमका कशाने झाला हे सांगता येणे सध्या कठीण आहे परंतु तिच्यात उष्मांघात च्या त्रासाचे लक्षणे जाणवत होते त्यामुळे उष्मांघात मुळे तिला त्रास होऊन तिचा मृत्यू झाला असावा असंही संशय आहे
डॉ गितेश चावडा
तालुका आरोग्य अधिकारी सोयगाव तर याप्रकरणी सोयगाव तहसील कार्यालयाने सदर युवतीचा मृत्यूची नोंद घेतली असून महसूल च्या पथकांनी घोसला गावात सायंकाळी उशिरा भेट दिली आहे……
