पुणे

पुणे शहरातील कचरा व्यवस्थापन ढेपाळलं

वेगवान मराठी / रमेश जयस्वाल

पुणे, ता. 25  मे 2024 –  शहरात घन कचरा व्यवस्थापनाचे तीन तेरा वाजले आहे• अनेक ठिकाणी भर रस्त्यालगत कचरा टाकण्याचा प्रकार घडत आहे• जागोजागी कचरा कोण टाकतोय यावर नियंत्रण नसल्या कारणाने आरोग्य समस्येला जनतेला तोंड द्यावे लागत आहे.

राहुल ,सोनिया गांधी यांनी पहिल्यांदा पंजाला मतदान केले नाही!

यावर घन कचरा व्यवस्थापन विभागाने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे• शिवाजीनगर मधील पाटील ईस्टेट पुलाखाली,कोथरूड,कर्वेनगर,बाणेर सिहगड रोड,स्वारगेट विभागात अनेक ठिकाणी कचरा रोडजवळच टाकण्याचा प्रकार घडत असतांनाही यावर घन कचरा विभागातील क्षेत्रीय कार्यालय लक्ष देण्यास तयार नाही जागोजागी कचरा पडत असल्या कारणाने दूर्गंधीचा सामना स्थानिक राहणारे जनतेला आणि पायी चालणारे व्यक्तिला करावा लागतो तर या कचरा टाकण्याच्या प्रकारामुळे डासांच्या प्रमाणात वाढ होत आहे• पावसाळ्याचे दिवस जवळ येऊन ठेपले तातडीने क्षेत्रीय विभागातील घन कचरा व्यवस्थापन विभागाने आता तरी पावले उचलावी •

कल्याणीनगर प्रकरणः सुरेंद्र अग्रवाल यास अटक आणि विशाल अग्रवाल यास 14 दिवसाची कोठडी

घन कचरा व्यवस्थापन नियम 2016 तील तरतुदीनुसार नुसार आरोग्य निरिक्षका मार्फत दंडात्मक कारवाई केली जात असली तरी क्षेत्रीय विभागातील कोणताही आरोग्य निरिक्षक कधीही त्या त्या विभागात फेरफटका मारत नाही यांचे फक्त राम भरोसे कामे सुरू कचरा गोळा करणे ,कचरा उचलणे आणि त्याचे विल्हेवाट लावण्या करिता सर्व ठेकेदारा मार्फतच कामे सुरू याचा परिणाम जनतेला भोगावा लागत आहे•

Cyclone Remal ताशी 100 किमी वेगवाने येणारे चक्रीवादळ ठरणार घातकं?

 बाणेर गावाजवळच कचरा साठविण्या प्रकार

बाणेर गावा जवळील एक बेवारस पडलेले पॅन कार्ड क्लब हॉटेल मध्ये जागोजागीचा कचरा आणून टाकल्या जात आहे• येथिल एका माजी नगरसेवकाने कचरा टाकण्याची परवानगी दिल्याचे कळते येथे या कचरा साठविला जातो प्लास्टिक,पूठ्ठे कचरा ईतर साहित्य वेगळे करण्या करिता येथे साठविण्याची परवानगी ठेकेदाराला देण्याचे कारण काय आणि हा बालेवाडीचा माजी नगरसेवक यांना कोणत्या नियमाने परवानगी देत आहे• उच्चभू सोसायट्याचे आणि स्मार्ट सिटीत गणल्या जाणारा विभाग अनेक कंपन्यांचे कार्यालय या विभागात आहे तर कचरा साठविण्या जवळच बाणेर गाव,प्राथमिक शाळा असे असतांनाही यांना परवानगी कशी दिल्यागेली याची चौकशी घन कचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांनी स्वतः पाहणी करण्याची मागणी या विभागातील जनतेने केली आहे •

राज्यात पाणीबाणी,धरणांतील पाणीसाठे संपण्याच्या बेतात

पॅन कार्ड क्लब हॉटेल बेवारस पडलेले आहे याची न्यायालयात केस दाखल झालेली आहे तसेच हे हॉटेल सद्या पोलीसांच्या निगरानी खाली आहे असे असतांनाही कचरा टाकण्याची परवानगी कशी देण्यात आली जवळच गावची वस्ती,शाळा,मोठमोठाल्या सोसायट्या,आयटी विभागाचे कार्यालय असे असतांनाही कचरा साठविल्या कसा जातो घन कचरा व्यवस्थापन विभाग झोपा काढत आहे काय•बाणेर दत्तमंदीर रोड जवळच कचरा टाकल्या जातो हा कचरा ऊचलत नसल्या कारणाने घाणीचे साम्राज्य दिसत आहे• घाणीचे सम्राज्यामुळे या विभागात डासाचे प्रमाणात वाढ झालेली दिसते •

घन कचरा व्यवस्थापन विभागाचे आरोग्य निरिक्षकांना कचरा गावाजवळील एका हॉटेल मध्ये साठवणूक केल्याचे आणि रोड जवळ कचरा टाकण्याचा प्रकार दिसत नाही काय हे आरोग्य निरिक्षक झोपा काढण्यातच गूंग असल्याचे दिसते पुढे पावसाळा जवळ येत असल्या कचरा साठविण्याच्या प्रकारामुळे ऐखादी साथीचा रोग पसरल्यास याला कोण जबाबदार राहील• घन कचरा व्यवस्थापन विभागाने क्षेत्रीय कार्यालयासगट पाहणी करून योग्य नियोजन करावे अशी मागणी जनते कडून होत आहे•

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!