महाराष्ट्र

जे नको व्हायला तेच झालं..चक्रीवादळाने भयकंर रुप धारण केलं

जे नको व्हायला तेच झालं..चक्रीवादळाने भयकंर रुप धारण केलं The unexpected happened..the cyclone took a terrible form

वेगवान मराठी / एकनाथ भालेराव, अरुण थोरे

पुणे , ता. 30 आॅगस्ट  महाराष्ट्रात पाऊस  पुन्हा जोर पकडणार आहे. असाइशार देण्यात आला आहे. दिनांक 1 2 3 4 5 6 सप्टेंबर पर्यंत विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र कोकण पश्चिम महाराष्ट्र मध्ये पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. महाराष्ट्रासह देशभरात पावसाने चांगलचं तांडव केले असून  महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, ओडिशा, बिहार आणि गुजरातमध्ये जोरदार पाऊस झाला आहे. मुसळधार पावसामुळे गुजरातची परिस्थिती बिकट झाली आहे. त्यात आता मोठं संकट म्हणजे जे नको व्हायला तेच झालं..चक्रीवादळाने भयकंर रुप धारण करण्यास सुरुवात केली आहे. याचा परिणाम फार मोठा होणार आहे.  The unexpected happened..the cyclone took a terrible form

नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली वर्धा चंद्रपूर अमरावती वाशिम यवतमाळ अकोला बुलढाणा नांदेड हिंगोली परभणी जालना छ. संभाजीनगर जळगाव धुळे नाशिक नंदुरबार बीड लातूर कोल्हापूर सांगली पश्चिम सातारा पुणे घाटमाथा अ.नगर उत्तर भाग येथे पावसाचा जोर राहील

महाराष्ट्रासह देशभरात पावसाने वेग घेतला आहे. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, ओडिशा, बिहार आणि गुजरातमध्ये जोरदार पाऊस झाला आहे. मुसळधार पावसामुळे गुजरातची परिस्थिती बिकट झाली आहे.

अनेक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. दुर्दैवाने मुसळधार पावसामुळे काही लोकांना जीव गमवावा लागला आहे. भारतीय हवामान खात्याने एक गंभीर इशारा जारी केला असून, मोठ्या संकटाचे संकेत दिले आहेत.

अरबी समुद्रात ‘आसन’ नावाचे चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हे चक्रीवादळ शुक्रवारी कच्छ-पाकिस्तान किनारपट्टीवर धडकू शकते, असा इशारा त्यांनी दिला.

ऑगस्ट महिन्यात अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण झाल्याने हवामान तज्ज्ञ आश्चर्यचकित झाले असून ही घटना दुर्मिळ मानली जात आहे. साधारणपणे मार्च-एप्रिलमध्ये अरबी समुद्रात चक्रीवादळ तयार होतात. ऑगस्टमध्ये चक्रीवादळ सक्रिय होण्याची जवळपास साठ वर्षांत ही पहिलीच वेळ असल्याचे हवामान विभागाने नमूद केले आहे.

आजपासून महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकणातील कोल्हापूर, सातारा, पुणे आणि रायगड जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

याशिवाय बंगालच्या उपसागरात आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आजपासून महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!