महाराष्ट्र

महाराष्ट्रः देवा रे देवा.. निंबाच्या झाडावरचं गणपती बाप्पा अवतरले

महाराष्ट्रः आरे..देवा.. निंबाच्या झाडावरचं गणपती बाप्पा अवतरले आहे. यामुळे देव आणि धर्म यांची श्रेध्दा ठेवणा-या भक्तांसाठी हा एक श्रेध्दाचा विषय ठरला आहे.

वेगवान मराठी /  आत्माराम गायकवाड

जळगाव, ता. 16 सप्टेंबर 2024- नवनाथ महाराजांच्या मंदिराच्या आवारात अनेक वर्षापासून निंबाच्या झाडामध्ये गणपती बाप्पा अवतरले आहे.  या झाडावर अशी हुबेहूब प्रतिकृती निर्माण झाल्याने ही  निसर्गाची कृपा म्हणवी लागेल.

एकाच वेळी वावरातं तीन पिकं घेतली, पिके असं आले की ज्याचं नावं ते

या गावासह परिसरातील भाविकांची या ठिकाणी मोठी गर्दी होत असते. या रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. या झाडाची गावातील आणि परिसरातील भाविक विधी व पूजा करून या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी मोठा भाविक संख्येने येत असतात.

500 पेक्षा जास्त मोटार सायकलचा लिलाव कधी होणार

पाचोरा तालुक्यातील सारोळा खुर्द येथील नवनाथ महाराजांच्या मंदिराच्या आवारात अनेक वर्षांपासून निंबाच्या झाडामध्ये बाप्पा अवतरले आहे. निसर्गाने झाडामध्ये तयार केलेली बाप्पाची प्रतिकृती पुढे भाविक भक्तिभावाने नतमस्तक होत आहे. गणेशोत्सवानिमित्त या ठिकाणी नियमित पूजाअर्चा केली जात आहे.

सुमारे 60 वर्षाच्या निंबाच्या झाडामध्ये अनेक वर्षांपासून हुबेहूब गणपतीच्या आकाराची मूर्तीच अवतरली आहे. या ठिकाणी दर्शनासाठी भाविकांची सारोळा गावासह परिसरातील भाविकांची मोठी गर्दी होत असते. झाडामध्ये गणपती सारखा आकार व चक्क सोंडही असल्याने या झाडाची गावातील व परिसरातील भाविक विधीवत पूजा करून या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी मोठ्या भाविक संख्येने येत असतात. निसर्गाच्या हा चमत्कार पाहून अनेक जण थक्क होतात

नवनाथ महाराजांचे सारोळे गावाला लिंबाच्या झाडावर अवतरलेली ही प्रतिकृतीमुळे  बरेच भाविक मंडळी सेवा करतात आणि भरपूर पूजन पाठ, भजन, पूजन करतात.

आमच्या सारोळ्या गावाची महिमा या गणपती बाप्पा मुळे सर्व दुर पसरला असून यामुळे गावाला काही अनिष्ठ घडतं नाही. येथील ग्रामस्थ खूप भाविक भक्तीने  आनंदाने उत्सव साजरा करत असतात. कितेक वर्षापासून हे गणपती अवतरल्यामुळे त्याची रंग रंगोटी केली जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!