500 पेक्षा जास्त मोटार सायकलचा लिलाव कधी होणार
500 पेक्षा जास्त मोटार सायकलचा लिलाव कधी होणार

वेगवान मराठी / मारूती जगधने
नांदगांव शहर पोलीस स्थानकात सुमारे ६५ गावे येतात येथे इंग्रज काळापासून असलेली पोलीस कुमक ४८ एवढीच आहे. यात आज पर्यंत वाढ झालेली नाही पण दिवसेदिवस वेगवेगळ्या गुन्ह्यात वाढ होत आहे. नांदगांव पोलीस स्थानकात अपघात, चोरी,अन्य गुन्ह्यात सुमारे ५०० हुन अधिक मोटार सायकल पोलीस स्थानकाच्या आवारात पडून आहेत. यामुळे जागा तर आडकली पण येथील विमुकल्याना किंवा पोलीस कर्मचारी यांना खेळाचे किंवा परेडचे मैदान देखिल अडकून पडले आहे .यातील बेवारस मोटारसायकलचा लिलाव कधी होणार हा प्रश्न उपस्थितीत केला जात आहे.
नार- पार नदिजोड प्रकल्पात नांदगांव तालुका कधी येणार!
पोलीस कर्मचारी वसाहत अनेक गरजांना पूर्ण करणारी आणि सुरक्षित वातावरणात असावी. त्यासाठी काही महत्त्वाच्या बाबींची काळजी घेतली जावी:
पोलीस वसाहत सुरक्षित असावी. प्रवेशद्वारांवर सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षा कर्मचारी, आणि प्रवेश मर्यादित ठेवण्याचे उपाय असावेत. राहण्याची जागा आरामदायक आणि सर्व आवश्यक सुविधांनी सज्ज असावी, जसे की पाणी, वीज, स्वच्छता, आणि आवश्यक ती निगा.राखली जावी.
अमिताभ बच्चन आणि रेखामध्ये अफेर होतं का ? बच्चन काय म्हटले
वसाहतीजवळ शाळा आणि प्राथमिक आरोग्य केंद्र असावे, ज्यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना सुविधा मिळतील. खेळाची आणि फिटनेसची साधने वसाहतीत मुलांसाठी खेळाची मैदाने, व्यायामशाळा, आणि पार्क असावेत ज्यामुळे आरोग्यपूर्ण वातावरण निर्माण होईल.परंतु येथे तसे काही दिसून येत नाही उलट मैदान हे दुचाकी व चारचाकींनी अडकून पडले आहे.
युट्युब व्हिडीओ पाहून डॉक्टर ने आपरेशन केले आणि
वसाहतीत सांस्कृतिक कार्यक्रम, समाजकार्य, आणि इतर कार्यक्रमांसाठी हॉल किंवा सभागृह नाही.पोलीस वसाहत चांगल्या पब्लिक ट्रान्सपोर्टने जोडलेली असावी, ज्यामुळे कर्मचार्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी सहज पोहोचता येईल.ते काही नाही.
सुंदर महिलेशी मैत्रीः रात्रीच्या त्या 27 व्हिडीओचे शुटींग,
पोलीस वसाहतीचा परिसर स्वच्छ, हरित आणि पर्यावरणपूरक ठेवणे महत्त्वाचे आहे. वेस्ट मॅनेजमेंट, पाण्याचे संवर्धन आणि पर्यावरणपूरक ऊर्जा वापरण्याची यंत्रणा असावी.पण तसे काही नाही गुन्ह्यातील प्रकरणात आडकलेल्या आनेक मोटरसायकली येथे उभ्या करुन ठेवल्या आहेत त्यामुळे परीसारात घान कचरा साचला आहे .
पोलीस वसाहतीत अग्निशमन यंत्रणा, प्राथमिक उपचार साधने, आणि इतर आपत्कालीन सुविधांची व्यवस्था नाही. या सर्व बाबींची काळजी घेतल्यास पोलीस कर्मचारी वसाहत एक सुरक्षित, आरामदायक आणि सुसज्ज जागा होऊ शकते.
तसेच वेगवेगळ्या गुन्ह्यात अडकलेल्या शेकडो मोटरसायकल सायकल ची नियमानुसार वरुष्टांच्या परवानगीने विल्हेवाट लावने आवश्यक आहे जेने करुन सदर जागा मोकळी होईल शिवाय चोरी व अन्य गुन्ह्यांच्या तपासकामी पोलीस कर्मचारी कमतरता असल्याने आनेक गुन्हे पेंडीग आहेत अधिक पोलीस बळ मिळाल्यास तपास यंञणा वेगाने काम करील.
त्यासाठी वरुष्टांनी लक्ष देऊन हे काम मार्गी लावावे. तसेच नांदगांव पोलिस स्थानकाच्या दर्शनी भागात आनेक वाहने पार्कीग केलेली असतात त्यामुळे येथे वाहन तळाचे स्वरूप आले आहे . पोलीस स्थानकाच्या मागील जागा गुन्ह्यातील वाहनांनी व्यापली तर पोलीस स्थानकाच्या पुढील जागा बेकायदेशीर वाहन तळाने व्यापली आहे त्यामुळे येथे पुरेशी जागा उपलब्ध नाही तसेच पोलीस स्थानकाच्या मैदानावर मोर्चा आंदोलन उपोषन यांच्या साठी असलेली जागा अतिक्रमणामुळे आडकली आहे .पोलीसस्थानकाला अतिक्रमणाचा विळखा पडला आहे .याकडे पालीक प्रशासनाने लक्ष घालावे .








