पत्रकार संरक्षण समिती पाचोरा तालुका जम्बो कार्यकारणी जाहीर
Journalist Protection Committee Pachora Taluka Jumbo executive announced

वेगवान मराठी
जळगाव, ता. 16 – पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय विनोदजी पत्रे यांच्या आदेशाने जळगाव जिल्हा अध्यक्ष आत्माराम गायकवाड यांच्या उपस्थितीत आज पत्रकार संरक्षण समिती पाचोरा तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली
.आज पाचोरा येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीत ही जम्बो कार्यकारणी तीन विभागांमध्ये करण्यात आली आहे.यावेळी पत्रकार संरक्षण समिती पाचोरा तालुका अध्यक्ष दैनिक लोकमतचे हेमशंकर तिवारी यांची पाचोरा तालुका अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली.
तर उपाध्यक्षपदी दैनिक सकाळ चे प्रतिनिधी राजेंद्र पाटील तर तालुका सचिव पदी लोकमतचे सुनील लोहार, सहसचिव पदी देशदूतचे शिवाजी सुतार ,कार्याध्यक्षपदी दैनिक लोकशाहीचे बाबूलाल पटेल, सल्लागार जेष्ठ पत्रकार किशोर लोहार यांची एकमताने निवड करण्यात आली तर ग्रामीण कार्यकारणी ची देखील यावेळी जाहीर करण्यात आली.
पत्रकार संरक्षण समिती पाचोरा ग्रामीण तालुकाध्यक्षपदी दैनिक देशोन्नती चे रावसाहेब राऊत तर उपाध्यक्षपदी जन जागर मराठी न्युज चे संजय परदेशी,सचिव पदी लोकमतचे रोशन जैन आदींची एकमताने निवड करण्यात आली तर पाचोरा शहर कार्यकारणी देखील यावेळी जाहीर करण्यात आली.
पत्रकार संरक्षण समिती पाचोरा शहराध्यक्षपदी दैनिक नवभारत वृत्तपत्राचे पाचोरा तालुका प्रतिनिधी राहुल शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली. यावेळी पत्रकार संरक्षण समितीच्या जम्बो कार्यकारणी निवड प्रसंगी पाचोरा तालुक्यातील मोठ्या संख्येने पत्रकार बांधव उपस्थित होते.
