बांगर कुटुंबाला जेलची हावा दाखविणारं पोलीस प्रशासन चंदुलाल बियाणीच्या मुसक्या कधी आवळणार ?,
बांगर प्रकरणी पोलिसांनी दाखवलेली चपळाई बियाणी प्रकरणात का नाही

केशव मुंडे वेगवान मराठी प्रतिनिधी परळी बीड —
दिनांक-9.ऑक्टोंबर.2024:–आज सहकार संस्थेतील 13 कोटीच्या अपहार प्रकरणी पाटोदा पोलिसांनी संस्थानिक क्षेत्रातिल व्यवसायिक रामकृष्ण बांगर आणी त्यांच्या 41 संचालकांवर गुन्हा दाखल करुण घेऊण रामकृष्ण बांगर यांच्या पत्नी सत्यभामा बांगर यांना तातडीनं अटक करुण जेरबंद केले आहे…
परंतु मागील एक वर्षापासुण राजस्थानी मल्टिस्टेट को औपरेटिव्ह सोसायटीचा चेअरमन हाजारभर कोटीचा घोटाळा करुण फरार आहे त्या चंदुलाल बियांनी आणि त्यांच्या संचालक मंडळाला अटक करा म्हणुण ठेवीदार पोलीस प्रशासनाचे उंबरे झिजवत आहेत,अमरण उपोषण आणि आंदोलनं करत आहेत परंतु चंदुलाल बियाणीच्या बाबतीत भुमिका घेण्यास पोलीस प्रशासन हातबल आसल्या सारखं का वागतयं,याचं कारण ठेवीदारांना समजुन येत नाही.
परंतु ठेविदार जर राजस्थानीचे चेअरमन चंदुलाल बियाणी यांच्या अथवा संचालकांच्या घरी किंवा फर्मवर जाऊण ठेवी संदर्भात जाब विचारायला गेले तर आणि आक्रमक होताना दिसले तर तेच पोलीस तातडीने घटणास्थळी येऊण उलट ठेवीदारांनाच दाबदडप करतात पकडुण पोलीस स्टेशन मध्ये घेऊण जाऊण गुन्हा दाखल करण्याची धमकी देतात एका वर्षापासुण आसे प्रकार ठेवीदारांच्या बाबतीत वारंवार घडत आसल्याचे सांगण्यात येत आहे
एकाच देशात एकाच राज्यात एकाच जिल्ह्यात आणि समान गुन्हाखाली आरोपी आसलेल्या दोन व्यकतींना असमान न्याय देण्याचा पराक्रम बीड पोलीस कोणाच्या दबाखाली आथवा कोणाच्या आमिषाला बळी पडुण चंदुलाल बियाणी आणि संचालकांचा बचाव करत आहेत हे लपुण राहीले नसुण आता ठेवीदारांसह सामान्य जनता देखील याबाबत उघडपणे पोलीस प्रशासनाच्या गुन्हेगाराचा बचाव करण्याच्या पक्षपाती भुमिकेवर प्रश्न उपस्थिति करत आहे….

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.