
केशव मुंडे वेगवान मराठी परळी बीड महाराष्ट्र –निवडणुक विशेष लेख दिनांक 22/10/2024
इ.स.2024 या वर्षीच्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकी च्या मतदानाची तारीख एका महिण्यावर येऊण ठेपली आहे,आघाडी मध्ये प्रमुख 3 पक्ष आणि युती मधिल 3 आसे मिळुण एकुण 6 मुख्य पक्ष निवडणुकीत आमणे सामने आहेत,
याच बरोबर राज ठाकरेंची मनसे आंबेडकरांची,वंचित आघाडी,एमआयएम,आणि बच्चु कड्ड यांची तिसरी आघाडी देखील या राजकीय आखाड्यातील प्रतिस्पर्धी आहेत,
आघाडी आणि युती करुण सामुहीक पणे निवडणुकीस सामोर जाण्यामुळे प्रत्येक पक्षाच्या विस्ताराला मर्यादा आली आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांच्या आशा आकांक्षांवर गद्दा आल्यामुळे नाराजांची आणि बंडखोरांची संख्या प्रत्येक मतदार संघात तिप्पट झालेली दिसतेय,
यातच मराठा आरक्षणाचे आंदोलन कर्ते मनोज जरांगे पाटील यांनी कालच्या 20 तारखेच्या दिवशी काही जागेवर निवडणुक लढण्याची,काही जागांवर पाठींब्याची तर काही जागा पाडण्याची भुमीका जाहीर केली आहे तर दुसरीकडे ओबीसी नेते लक्षमन हाके यांनी देखील मनोज जरांगे आणि शरद पवार यांच्या विरोधात जे शक्य वाटेल ते करु पण जरांगे पाटलांना या निवडणुकीतील धडा शिकवु आसे वक्तव्य केले आहे याबरोबरच ओबीसींना विरोध करणाऱ्या मराठा आमदारांना ओबीसी समाज मतदान करणार नसल्याचे हाके यांनी सांगितले आहे तर ओबीसीचे 100 आमदार निवडुण येतील आसे नवानथ वाघमारे म्हणालेत यामुळे राजकिय पक्षांच्या उमेदवारांसह नेत्यांच्या उरात धडकी भरली आहे…
वरील नमुद केलेल्या सर्व पाडा पाडीच्या घटणा पाहता प्रमुख राजकिय पक्षांच्या उमेदवारांच्या विशेषत: आघाडी आणि युती च्या लढाई मध्ये वंचित आघाडी आणि मनोज जरांगे पाटील यांच्या उमेदवारां बरोबरच काही मतदार संघात अपक्ष उमेदवार देखील बाजी मारून जातील
कोणी काही जरी बोलले तरी किमान 50 उमेदवार मनोज जरांगे पाटील यांचे सभाग्रहात पाहायला मिळतील तर वंचित आघाडी यावेळी आता पर्यंतच्या त्यांच्या वाटचालीतील बेस्ट आकडा गाठेल आणि उमेदवारी न मिळाल्यामुळे अपक्ष उभे राहिलेले काही बाहुबली आणि काही नविन अपक्ष चेहरे देखील यावर्षीच्या पंचवार्षिक निवडणूक महोत्स्वा मधुन निवडुण येतील
राज्यातील जनतेचा एकुणच कौल पाहता युती सत्तेमध्ये येण्याची सुतराम शक्यता तर नाहीच परंतु आघाडी देखील काटावर येऊण लटकली तर महाराष्ट्र राज्याचा नविन मुख्यमंत्री मनोज जरांगे,वंचित आघाडी,आणि अपक्ष ठरवतील हि काळ्या दगडा वरिल पांढरी रेघ आहे !
✒️ केशव मुंडे 8888 387 622

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.