
केशव मुंडे वेगवान मराठी परळी: –२२-१०-२४
किल्लारी येथील झालेल्या भुकंपा पासुण मराठवाडा हे भुकंपाचे केंद्र बिंदु झाले आहे आणि काही ठराविक ठरावीक कालावधीपर्यंत भुकंप आणि ज्वालामुखी हे एकाच ठिकाणी मुक्कामी राहणे पसंत करतात म्हणजे काही काळ त्याच परिसरात राहुण राहुण निसर्ग मानवाला आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देत आसतो.या जाणीवेचा इशारा गंभीरतेने घेतला नाही तर मग निसर्गा च्या कोपाला सामोर जाण्या शिवाय दुसरा पर्याय नसतो…
मागील काही काळा पासुण लातुरच्या शेजारील नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात भुकंपाचे झटके हामखास जानवत आहेत तसाच प्रकार आज पहाटे देखील हिंगोलीतील कळमणुरी आणि नांदेड येथील हादगाव तालुक्यातील काही गावांना जानवला आहे त्याची तिव्रता 3.8 एवढी रिक्टर स्केलवर नोंदवली गेली आहे
पिंपळदरी पांगरा शिंदे, बोल्डा, सिनगी, वापटी या गावांमध्ये हे भूकंपाचे धक्के जाणवल्याची प्राथमिक माहिती ग्रामस्थांनी दिली आहे दरम्यान प्रशासनानं नागरिकांना घाबरून न जाता काळजी घ्यावी आणि सतर्क रहावे असे आवाहन केले आहे. सध्या हिंगोली कळमणुरी आणि औंढा येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे..या परिसरात सातत्याने भुकंपाचे झटके बसत आहेत , याचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक वेळी भुकंप हा पहाटेच होत आहे …

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.