हनुमंतखेडा येथे एक मुलगी तर बोरमाळतांडा येथे एक मुलगा विज पडून मृत्यू झाला

वेगवान मराठी
सोयगाव ता २१ प्रतिनिधी…)हनुमंतखेडा (ता.सोयगांव) येथे शेतातुन घरी जातांना चौदा वर्षिय मुलगी, तर बोरमाळ तांडा (ता.सोयगांव) येथील बकऱ्या चारतांना सोळा वर्षीय तरुणासह आठ बकऱ्यांच्या वीज पडून जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना सोमवारी (ता २१)तीन वाजेच्या सुमारास घडली.
आश्विनी मच्छिंद्र राठोड (वय.१४ )रा हनुमंतखेडा, अजय नथ्थु राठोड (वय १६)रा.बोरमाळ तांडा असे मृतांचे नावे आहेत.
बनोटी परिसरातील गेल्या दहा दिवसांपासून परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. सकाळ पासुन पाऊस विश्रांती घेत दुपारी दोन वाजेपासुन विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतकरी मजुर जिवाची पर्वा न करता मिळेल त्या वेळेत शेतातील कामे करीत आहेत हनुमंतखेडा येथील मृत मुलीबरोबर आई वडील, बहीण आणि भाऊ असे पाचही जण हनुमंतखेडा शिवारातील गट क्रमांक १२९ मध्ये कापुस वेचताना अचानक विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाल्याने आई वडील व मुलांनी घेत घरचा रस्ता धरला घराकडे येतांना आश्विनी सर्वात पुढे होती आणि आई वडील भाऊ बहीण चालत असतांना अचानकपणे वीज पडली यात आश्वनीचा जागीच मृत्यू झाला सुदैवाने यात आई, वडील, भाऊ आणि बहीण असे चार काहीही इजा पोहचली नाही. बोरमाळ तांडा येथील अजय नथ्थु राठोड हे सकाळी दहा वाजता नेहमी प्रमाणे बकऱ्या घेऊन जंगली कोठा शिवारात चारण्यासाठी घेऊन गेला बकऱ्या चारत असतांना अचानक वीज कोसळली यात त्याचा जागीच मृत्यू झाला तर आठ शेळ्या ही वीजेचा धक्का बसून मृत्यू झाला शिवारातील मजुर धावत जाऊन बघितले असता हा प्रकार लक्षात आला.
दोघाही मृत अल्पवयीन मुलांना बनोटी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता आरोग्य अधिकारी डॉ रब्बानी शेख यांनी तपासून मृत केले त्याच्यावर बनोटी येथील आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. बनोटी दुरक्षेत्रात दोन्हीही घटनेची अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
