शाळेला विरोध नाही मात्र ठेवीदारांच्या आड याल तर सुट्टी नाही-सेवकराम जाधव
Poddar Aso or Mount Litra School is not opposed, but if it comes in the way of the interests of the depositors, it will not be abandoned - Sevakram Jadhav warns

“पोद्दार असो की माउंट लिट्रा स्कुल असो” आमचा कुठल्याच शाळेला विरोध नाही
मात्र आमच्या हक्काच्या ठेवीच्या आड येणाराला आम्ही सोडणार नाही – सेवकराम जाधव

परळी वैजनाथ दिनांक 7 जुन 2025-वेगवान मराठी प्रतिनिधी केशव डी मुंडे
परळी वैजनाथ-राजस्थानी मल्टी स्टेट व राजस्थानी पतसंस्थेचे संचालक मंडळ ठेवीदारांना चुना लावून पैशाच्या जीवावर दीड वर्षापासून पसार झाले आहेत. बीड जिल्ह्याची संबंधित पोलीस यंत्रणा फरार मल्टीस्टेट वाल्यांना पकडण्यात सपशेल अयशस्वी ठरली असून ठेवीदार देशोधडीला लागले आहेत.
मात्र आमच्या हक्काच्या ठेवीच्या आड येणाराला आम्ही कायदेशीर धडा शिकविल्या शिवाय राहणार नाही.
असे मत ठेवीदार कृती समितीचे अध्यक्ष सेवकराम जाधव यांनी व्यक्त केले आहे.
दोषी संचालक मंडळाची मालमत्ता एमपीआयडी मध्ये घेण्याची प्रक्रिया सुरु असून प्रस्ताव लवकरच मंजूर होईल, राजस्थानी मल्टिस्टेटवर लिक्विडटर ची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
काही दिवसातच पदभार स्वीकारून त्यांच्या माध्यमातून पुढील कामकाज सुरु होईल. इथपर्यंत ठेवीदारांच्या अथक प्रयत्नांना यश आलेले आहे.
मात्र परळी वैजनाथ येथील गंगाखेड रोडवर चंदूलाल बियाणी व बद्रीनारायण बाहेती यांच्या मालकीची सरासरी पाच एक्कर जागा आहे.
विशेष म्हणजे या जागेवर राजस्थानी पत संस्थेचा बोजा पडलेला आहे. सदरील जागेवर एक इमारत आहे जिथे मागील दहा वर्षांपासून यांच्याच मालकीची पोद्दार लर्न स्कुल चालायची.
गुन्हा दाखल झाल्या कारणाने चंदूलाल बियाणी अटक तर बद्रीनारायण बाहेती फरार झाले. मग पोद्दार स्कुलची जबाबदारी प्रिंसिपल भीम प्रताप सिंग यांच्यावर आली.
दरम्यान संचालक बियाणी, बाहेती नसल्याचा फायदा घेत शिक्षकांच्या पगारीसह पी एफ मधे अफरातफर केली, पालकांचे डिपॉझिटचे पैसे बुडवले, बसवाल्यांचे पैसे बुडवले ठेवीदार कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले.
हे कमी झाले की काय, चंदूलाल बियाणी यांनी बी पी सिंग वर विश्वासाने शाळेची सर्व जबाबदारी सोपविली होती.
त्या विश्वासाशी गद्दारी करत. सिंग यांनी स्वतः 500 रुपयाच्या बॉण्डवर लिखित स्वरूपात पोद्दार स्कुलचे सर्व साहित्य माऊन्ट लिट्रा झी स्कुल च्या स्वाधीन केले.
तसे पहिले तर दि. 30 मार्च 2025 ला पोद्दार स्कुलच्या प्रिन्सिपल पदाचा राजीनामा देत असल्याचे या महाशयांनी जाहीर केले होते.
परंतु परवा पोलीस अधीक्षक साहेब,बीड यांच्याकडे “परस्पर माझे ऑफिस फोडले म्हणत” तक्रार अर्ज दिला आहे.
त्या अर्जात स्वतः पोद्दार स्कुल चा प्रिन्सिपल असल्याचे नमूद केले आहे. एकंदरीत भीम प्रताप सिंग यांना काय प्रताप करायचा आहे त्यांनाच ठाऊक.
“पोद्दार स्कुल असो की माउंट लिट्रा स्कुल असो” आमचा कुठल्याच शाळेला विरोध नाही.
मात्र त्या जागेचे येणारे भाडे आमच्या प्रशासकाच्या खात्यावरच जमा होईल.
हा आमचा हक्क आणि आग्रह असणार असल्याचे ठेवीदार कृती समितीचे अध्यक्ष सेवकराम जाधव यांनी म्हटले आहे.

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.








