क्राईमछत्रपती संभाजी नगरपुणेबीड

बीड येथील सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात चाटे आणि केदार ताब्यात

Santosh desmukh kaij murder case issue chatte & kedar Arest him

केशव मुंडे वेगवान मराठी परळी -10/12/2024

वेगवान मराठी  बीड येथील सरपंच संतोष देशमुख प्रकरणात जयराम माणिक चाटे (वय 21 रा.तांबवा ता. केज), महेश सखाराम केदार (वय 21 वर्षे रा. मैंदवाडी ता.धारुर) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. या आरोपींना विश्वासात घेऊन इतर आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. आज मंगळवारी दुपारी त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. दरम्यान मस्साजोग येथे ग्रामस्थांचा रास्ता रोको सुरु आहे. अद्यापही नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतलेला नाही.

दरम्यान बीड जिल्ह्यातील केज,मस्साजोग,अंबाजोगाई,सह इतर ठिकाणी देखील देशमुख यांच्या घटणेच्या निषेधार्थ आणि आरोपीनां अटक करण्यात यावी यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहेत,

या घटणेचे राजकिय पडसाद देखील उमटायला सुरुवात झाली असुण बीडचे खा.बजरंग सोनवणे यांनी नाव न घेता राजकीय वरदाहास्तामुळेच आरोपींना मस्साजोग ग्रामपंचायत चे सरपंच संतोष देशमुख यांचा खून करण्यात बळ मिळाले आसल्याचे नांव न घेता गंभीर आरोप केले आहेत…

तसेच आज केज येथील रास्ता रोको आंदोलना दरम्यान काही आंदोलकांनी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात घोषणा देत छत्रपती शिवाजी महाराज चौकातील धनंजय मुंडे यांचे लावण्यात आलेले फ्लेक्स,बैनर फाडत आंदोलकांनी त्यांचा रोष व्यकत केल्याचे दिसून आले आहे तर सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबातील सदस्यांना भेटण्यासाठी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील मस्साजोग कडे निघाल्याचे वृत हाती आले आहे,

सदरील घटणे तील संशयित आरोपी हे वंजारी समाजाचे आणि या घटणेत मृत झालेले सरपंच संतोष देशमुख हे मराठा समाजाचे असल्याने सामाजिक तेढ निर्मान होऊण परस्थिती हाताबाहेर जाऊ नये याची खबरदारी पोलीस प्रशासन घेत असुण जनतेनी अफवांना बळी न पडता शांत राहण्याचे आव्हाण पोलीसांनी कडुण करण्यात आले आहे

केज – तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष पंडीतराव देशमुख यांच्या निर्दयी हत्येप्रकरणी सुदर्शन घुले (रा. टाकळी ता. केज) व इतर पाच आरोपींवर केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. आरोपींना अटक होत नसल्याने केज तालुक्यातील ग्रामस्थात प्रचंड रोष आहे. केज शहरात आणि मस्साजोग येथे रास्ता रोको आंदोलन सुरु आहे. या पार्श्वभूमीवर अपर पोलीस अधीक्षक पांडकर, चेतना तिडके यांनी घटनास्थळी धाव घेऊन पोलीस निरीक्षक उस्मान शेख, प्रशांत महाजन यांना आदेशित करून आरोपींच्या शोधासाठी तात्काळ पथके रवाना केली आहेत.

सदरील आरोपींचा वाशी, धाराशिव परीसरात शोध घेत असतांना मिळालेल्या माहीतीच्या आधारे पोलिसांनी जयराम माणिक चाटे (रा. तांबवा ता.केज) आणि महेश सखाराम केदार (रा. मैंदवाडी ता.धारुर) या दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. सध्या त्यांची कसून चौकशी सुरु असून त्यांच्याकडून इतर आरोपींची माहिती घेण्याबाबत प्रयत्न सुरु आहेत. गुन्हयात सहभागी प्रत्येकावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार असून नागरिकांनी अफवावर विश्वास ठेऊ नये असे आवाहन प्रभारी पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी केले आहे.

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!