क्राईमबीड

तर मल्टिस्टेट संचालकांच्या विरोधात आंदोलन छेडण्यात येईल-सेवकराम जाधव

KESHAV D MUNDE WEGWAN MARATHI MAHARASHTRA

!! राजस्थानी मल्टी स्टेट प्रकरणात चार्जशीट मधून नावे गायब करण्यासाठी संचालकांची चढाओढ !!

!! विजय लड्डा, अशोक जाजू यांना “चमडी बचाव” सोबत ठेवीदारांच्या “मरण यातना” दिसतील का ? – सेवकराम जाधव !!

वेगवान मराठी परळी / प्रतिनिधी केशव डि मुंडे दिनांक -१४ जुलै २०२६-
राजस्थानी मल्टी स्टेट,पतसंस्थेतील हजारो ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये अडकलेले असताना, काही संचालक मात्र बनावट राजीनामा पत्रांच्या आधारे विविध ठिकाणी दोषारोप पत्रातून स्वतःची नावे वगळून घेण्यासाठी चढाओढ करत आहेत.

या प्रकारामुळे ठेवीदारांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून, “संचालक चुकीच्या मार्गाने स्वतःची सुटका करून घेत असतील तर मग ठेवीदारांना न्याय कसा मिळणार ?”

विजय लड्डा, अशोक जाजू यांना “चमडी बचाव” सोबत ठेवीदारांच्या “मरण यातना” दिसतील का? असा सवाल राजस्थानी ठेवीदार कृती समितीचे अध्यक्ष सेवकराम जाधव यांनी केला आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड आणि ढाणखी येथील गुन्ह्यांमध्ये चुकीचे दस्तऐवज सादर करून आर्थिक गुन्हे शाखेकडून पुरवणी दोषारोप पत्रातून नावे वगळण्यात आले आहेत.

तसेच लातूर, धाराशिव, पंढरपूर, बीड आणि परभणी येथील गुन्ह्यांमध्येही अशाच प्रकारच्या हालचाली सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

जर संचालक स्वतःची नावे दोषारोपपत्रांतून वगळण्यात यशस्वी होत असतील, तर हजारो ठेवीदारांना न्याय कसा मिळणार? असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

संबंधित संचालकांकडून जुन्या राजीनाम्यांच्या प्रती दाखवून प्रशासनाची दिशाभूल केली जात असल्याचाही आरोप सेवकराम जाधव यांनी केला आहे.

राजस्थानी मल्टी स्टेटच्या घोटाळ्यात आधीच हजारो कुटुंब आर्थिक संकटात सापडलेली असताना, आता बनावट राजीनामे, दोषारोप पत्रातून नावे वगळणे या प्रकरणमुळे ठेवीदारांमधे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

राजस्थानी मल्टी स्टेट प्रकरणात चार्जशीट मधून नावे गायब करण्याची चढाओढ करण्यापेक्षा संचालक विजय लड्डा आणि अशोक जाजू यांना स्वतःची “चमडी बचाव” करण्यासोबत ठेवीदारांच्या “मरण यातना” दिसतील का ?

आणि या प्रकरणाचे पोलीस तपासाधिकारी याची दखल घेऊण कारवाई करणार का ? का मग आरोपी असलेल्या संचालकांना यातुन बाहेर पडण्यासाठी आंधळ्याचं सोंग घेऊन एकप्रकारे पोलीस हि त्यांनाच सहकार्य करत आहेत की काय ? असा संशय येत असल्याची नाराजी व्यक्त करण्यात आली आहे..

असा सवाल राजस्थानी ठेवीदार कृती समितीचे अध्यक्ष सेवकराम जाधव यांनी उपस्थित केला असून या चुकीच्या प्रकरणा विरुद्ध तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!