
!! राज्यभर गाजलेल्या आणि आरोप प्रति आरोपांमुळे गुंतागुंतीत अडकलेल्या परळी तालुक्यातील मरळवाडी गावचे सरपंच बापु आंधळे खून प्रकरणातील मोठी अपडेट !!
वेगवान मराठी केशव डि मुंडे दि 26 सप्टेंबर २०२५ परळी वैजनाथ : राज्यात गाजलेल्या परळी तालुक्यातील मरळवाडी गावचे तरुण सरपंच बापु आंधळे खून प्रकरणातील आरोपी मुकुंद गित्ते व राजेश वाघमोडे यांना औरंगाबाद खंडपीठात जामिन मंजुर झाला असून न्यायमुर्ती श्री. संजय देशमुख यांनी हा गुंतागुंती च्या प्रकरणातील महत्वपूर्ण निकाल दिला आहे
!! या प्रकरणाची आणि जामिना संदर्भातील थोडक्यात वेगवान अपडेट! !!
बापु आंधळे खून प्रकरणाची फिर्याद हि त्यांच्या कुटुंबियां कडुण किंवा नातेवाईकां कडुण देण्यात आली नव्हती तर ति महादेव गित्ते यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपी ग्यानबा उर्फ गोट्या मारोती गित्ते याच्या फिर्यादीवरून परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली होती.
यामध्ये फिर्यादीने दिलेल्या माहितीप्रमाणे, २९ जून २०२४ रोजी रात्री ८.३० च्या सुमारास आरोपी शशिकांत उर्फ बबन गित्ते व इतरांनी कट रचून बापु आंधळे यांच्यावर गोळीबार करून खुन करण्यात आल्याची तक्रार देण्यात आली होती
पुढे तक्रारीमध्ये त्यावेळी फिर्यादी गोट्या गित्ते यांच्यावरही जीव घेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता आसे सदरील तक्रारीमध्ये नमुद करण्यात आले होते
दरम्यान बबन गित्ते आणि महादेव गित्ते यांनी सदरील आरोप फेटाळुण लावत बापु आंधळे याचा खुन हा वाल्मिक कराड यांच्या सांगण्यावरुण गोट्या गित्ते व त्यांच्या इतर सहकाऱ्यांनीच घडवुण आणला आसुण आम्हाला यामध्ये राजकीय विरोधक म्हणुन नाहक गुंतवल्याचे सांगण्यात आले होते
दरम्यान या गुन्ह्यात आरोपींवर भादंवि कलम ३०२ ३०७, १२०-ब, २०१ अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता तर अंबाजोगाई सत्र न्यायालयाने आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला होता.
या नंतर आरोपी मुकुंद गित्ते व राजेश वाघमोडे यांनी अॅड. सुदर्शन साळुंके यांच्यामार्फत उच्च न्यायालय खंडपीठात जामीन अर्ज दाखल केला होता.
न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की या आरोपींनी फिर्यादीला केवळ लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे.
आरोपींवर पूर्वी कोणतेही गुन्हे दाखल नाहीत तसेच ते फरार होण्याची शक्यता नाही, त्यामुळे त्यांना जामीन देण्यास हरकत नाही .
WEGWAN MARATHI KESHAV D MUNDE 8888 387 622

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.








