राज्यपाल सि पि राधाकृष्णन उद्या बीड दौऱ्यावर
Governor C P Radhakrishnan to visit Beed district tomorrow

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचा बीड दौरा कार्यक्रम
{ केशव मुंडे वेगवान मराठी बीड}
बीड, दि. 8 (जि. मा. का.) महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन हे बुधवार, दि.9 ऑक्टोबर 2024 रोजी बीड जिल्हयाच्या दौ-यावर येत आहेत त्यांच्या दौ-याचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
बुधवार दि. 9 ऑक्टोंबर 2024 रोजी छत्रपती संभाजीनगर येथून सकाळी 9.55 वाजता शासकीय हेलीकॅप्टरने बीडकडे प्रयाण. सकाळी 10.30 वाजता बीड यथील पोलीस ग्राऊंडवर आगमन 10.35 वाजता बीड येथील शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. सकाळी 10.45 वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. सकाळी 11.00 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत विविध क्षेत्रातील व्यक्तींशी ते संवाद साधतील. दुपारी 1.00 ते 2.00 वाजेपर्यंत राखीव. दुपारी 2.00 वाजून 10 मिनिटांनी शासकीय विश्रामगृह, बीड येथून पोलीस ग्राऊंडकडे प्रयाण. दुपारी 2.15 वाजता शासकीय हेलीकॉप्टरने ते जालनाकडे प्रयाण करतील

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.