नाशिकः बाईन दारु पिऊन असं काही केलं की

वेगवान मराठी
नाशिक, ता. 27- नाशिक : नाशिकच्या गंगापूर रोडवर झालेल्या भीषण अपघातात एका वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू झाला. दारूच्या नशेत एका महिलेने चारचाकी वाहन चालवल्याने ही घटना घडल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेच्या अल्कोहोल चाचणी अहवालाची पुष्टी झाल्यानंतर तिला अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले आहे. Nashik: After drinking alcohol, he did something like that
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित स्मिता विजय रासकर, जहाँ सर्कल, गंगापूर रोडजवळील रोहित हाईट्स येथे राहणारी महिला 25 रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास तिची कार (नोंदणी क्रमांक MH 15 JM 0066) चालवत होती. रस्त्याच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष करून ती दारूच्या नशेत जहान सर्कल येथून गंगापूर गावाकडे जात होती.
ती सोमेश्वर पेट्रोलपंपाजवळ येऊन उजवीकडे वळण घेत असताना, गंगापूर गावातून येणाऱ्या दुचाकीला कार धडकली. शारदा सोसायटी, लक्ष्मी नगर, अमृतधाम, पंचवटी येथील रहिवासी 64 वर्षीय सुरेश वसंतराव वखारकर आणि 60 वर्षीय विद्या सुरेश वाखारकर यांना घेऊन जाणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक बसली.
हा अपघात इतका भीषण होता की वखारकर दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. याशिवाय मागून येणाऱ्या चारचाकी वाहनाचेही या घटनेत नुकसान झाले आहे.
