
केशव मुंडे परळी वेगवान मराठी दि 28 नोव्हेंबर 2024 – गंगाखेडःशहरातील ममता विद्यालयातील माध्यमिक विभागात कार्यरत आसलेल्या शिक्षक कुंटुबाने गुरूवारी दुपारी 3 च्या सुमारास गोदावरी पुल धारखेड परिसरातील रेल्वेच्या रुळावर परळीकडे जाणाऱ्या मालगाडी खाली जिवनयाञा संपविल्याने गंगाखेड शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
अहमतपुर तालुक्यातील खेडे गावातील मुळ रहिवाशी आसलेले मसनाजी तुडमे हे शहरातील ममता विद्यालयातील माध्यमिक विभागात शिक्षक पदी कार्यरत होते दि 28 नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता धारखेड परीसरातील रेल्वे रूळावर दुपारी 3 वा.च्या सुमारास परभणी कडून परळीकडे जाणारी मालगाडी येत आसल्याचे दिसताच शिक्षक मसनाजी सुभास तुडमे वय 45 पत्नी रंजना तुडमे वय 40 अजंली तुडमे मुलगी वय 21 हे तिघेजन ठरल्याप्रमाणे रेल्वे पटरी वर माना ठेवुण झोपले आसता त्यांच्या शरीरापासुण मानेचा भाग वेगळा होऊण याच क्षणी शिक्षक कुंटुबाचा करुन अंत झाला.
हे धाडसी पाऊल उचलण्यामागे असे काय घडले याचा अद्याप उलगडा झाला नसला तरी कारण गंभीर असावे अशी चर्चा शहरात होत असुण या घटणेबद्दल गंगाखेड शहर आणि परिसरातील जनते कडुण हळहळ व्यक्त करण्यात येत आहे,गंगाखेड पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले असुण या घटणेचा पुढील तपास गंगाखेड पोलीस करत आहेत…

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.