राजकारण

यश पदरात पाडून घेऊण अमित शहांनी केली एकनाथ शिंदेंना गार

AMIT SAHA EKNATH SHINDE DEVENDRA FADNAVIS & AJIT PAWAR S MEETING THE END

वेगवान मराठी -दिल्ली दिनांक 28/11/2024 रोजी ग्रहमंत्री अमित शहा यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी पार पडलेल्या युतीच्या मुख्य प्रमुख तिन नेत्यांची औपचारिक बैठक 3 नंतर रात्री 12 वाजता संपन्न झाली असुण,महाराष्ट्राचा मुख्यमंत्राी हा भाजपाचा होणार हे निश्चीत झाले असले तरी त्याची अधिकृत घोषणा हि भाजपाचे पर्यवेक्षक मुंबई मध्ये येऊण करणार आसल्याचे समजते,

दरम्यान मागील 2 वर्षापुर्वी भाजपाच्या आणि विशेषता देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात आलेला घास शरद पवार,संजय राऊत,यांनी कांग्रेस पक्षाच्या सहकार्याने काढुण घेतला होता,तेंव्हा दयणीय अवस्थेत सापडलेल्या भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांना एकनाथ शिंदे पंदाडात भोपळा गावल्यागत सापडले आणि एकनाथ शिंदे यांनी देखील वनवासात सापडलेल्या भाजपा आणि फडणवीस यांना मित्र वनव्यातला गारवा प्रदान केला एवढेच नाही तर मराठा आरक्षणामुळे मुटाकुटीला आलेल्या भाजपा आणि फडणवीस यांना यातुन सहीसलामत बाहेर काढले,याचबरोबर लोकसभा निवडणुकीत भाजपा सह अजित पवार गटाचा सुफडासाफ होत असताना स्वतःचे 7 खासदार जिंकुण आणन्याची किमया केली आणि नरेंद्र मोदी यांना कोणत्याही अटीशर्ती विना पाठिंबा दिला,

आता झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत देखील देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा यांच्या सभेतील खुर्च्या रिकाम्या राहत होत्या परंतु एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या कार्याच्या आणि साधेपणाच्या वर्तनुकिने महाराष्ट्रातील जनतेच्या मनात स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाले, पंतप्रधान,आणि संपुर्ण भाजपा देवेंद्र फडणवीस यांनां टेकु लावु लावु देखील फडणवीसांनां 10 वर्षात जमले नाही ते काम एकनाथ शिंदे यांनी 2 वर्षात करुण दाखवले आणि त्यामुळेच विरोधक तर सोडाच पण खुद देवेंद्र फडणवीस यांचा देखील कालच्या विजयावर विश्वास बसत नव्हता एवढा दैदिप्यमान विजय एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुतीला संपादन करता आला…

हे जरी खरे आसले तरी नविन भाजपा हा मोदी,शहा,देवेंद्र चा आहे हे एकनाथ मामा विसरुन गेले सत्तेसाठी काही पण करायला हापापलेली भाजपाई आणि सत्तेविना न जगु शकणारी राष्ट्रवादी यांच्या तावडीत सापडल्यामुळे उद्धव ठाकरे यांना टांग मारण्यात यशस्वी झालेल्या कणखर एकनाथ शिंदे यांचा अमित शहा देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी पद्धशिरपणे करेक्ट कार्यक्रम केला असुण उरलीसुरली कसर आज अमित शहा यांनी दिल्लीहुण बोळवुण करुण पुर्ण केली म्हटलें तर वावगे ठरणार नाही.बाकी काही आसले तरी भाजपा सत्तेसाठी हापापलेला पक्ष बनला आहे हि प्रतिमा वरचेवर गडद होताना दिसत आहे

एवढे मात्र नक्की आहे कि मराठा आरक्षणाचा प्रश्नी आणि येणाऱ्या महानगर पालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नाकी 9 आल्या शिवाय राहणार नाहीत

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!