नवीन मंत्रीमंडळात प्रथम हे आमदार शपथ घेण्याची शक्यता

वेगवान मराठी / धिरेंद्र कुलकर्णी
मुंबई, ता. अखेर महायुतीचा शपथविधी सोहळा 5 सप्टेंबरला होणार आहे आणि त्यासाठी मुहूर्त सापडला आहे. महायुतीमधील अजित पवार आणि एकनाथ शिंदे, बरोबर देवेंद्र फडणवीस या तीन नेत्यांचं हे महायुतीचे सरकार भाजप, राष्ट्रवादी, आणि शिवसेना असा आहे.
या सत्ता स्थापनेमध्ये मोठा संघर्ष महाराष्ट्राला पहावयास मिळाला आहे. एकनाथ शिंदे हे आपल्याला काही पद मिळावे यासाठी अडून बसलेले आहे. त्यांनी दिल्ली दरबारी याबाबत पाठपुरावा केला, मात्र एकनाथ शिंदे यांना दिल्लीतून बळवण करून पाठविण्यात आले.
आता एकनाथ शिंदे यांना एकांतवास हवा म्हणून ते त्यांच्या मूळ गावी आहे. आता 5 डिसेंबरला जो शपथविधी समांरभ होणार आहे. त्यामध्ये महायुतीमार्फत जे मंत्री म्हणून शपथ घेणार आहे. त्या संभव्य आमदारांची नावे समोर आलेले आहे. यामधील काही आमदार शपथ ग्रहण करणार असल्याचं समजत आहे.
या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित राहणार आहेत. गुरुवारी 5 डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत याच दिवशी भाजपचे १० ते १५ मंत्री शपथ घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता नुकतंच त्यांची नावे समोर आली आहेत.
देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भाजपचे 10 ते 15 मंत्री शपथ घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शपथ घेणाऱ्या या मंत्र्यांमध्ये जेष्ठ आणि तरुण आमदारांचाही समावेश असणार आहे.
यात चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, मंगल प्रभात लोढा, अतुल सावे, आशिष शेलार, पंकजा मुंडे, देवयानी फरांदे, नितेश राणे, गोपीचंद पडळकर, संजय कुटे या आमदारांना मंत्रिपदाची लॉटरी लागणार आहे.
मात्र अद्याप या नावांबद्दल अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आलेला नाही.
