महाराष्ट्र

महाराष्ट्रात पाऊस करणार धिंगाणा! हवामान विभागाचा अलर्ट Rain Update

महाराष्ट्रात पाऊस करणार धिंगाणा! हवामान विभागाचा अलर्ट Rain Update

वेगवान मराठी

नाशिक, ता. 7 डिसेंबर 2024 – Maharashtra Rain Forecast महाराष्ट्र मध्ये यंदा पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावल्यामुळे सर्वत्र पाणीचं पाणी दिसते होते.  पाऊस असा काही बरसला की शेतकरी वर्गासह इतरांना सुद्धा पाऊस नकोसा झाला होता. मुसळधार आणि पावसाच्या तांडवामुळे यावर्षी महाराष्ट्राला मोठा नुकसान सहन करावा लागलं. त्यातच बंगालच्या उपसागरामध्ये वादळी वारे आणि देशाच्या उत्तरे कडून येणार-या  वा-यामुळे यामुळे देशातील हवामानामध्ये मोठा बदल पाहायला मिळत आहे.

आज पासून पाऊस नाशिक जिल्ह्यात थांबला असला तरी राज्याचे पूर्व नागपूर ते नांदेड असा पावसाचा एक पट्टा 8 आणि 9 तारखेला त्या भागात विदर्भ आणि मराठवाडा ते सोलापूर चे काही भागात पाऊस होईल. नंतर मात्र नाशिक कडे 8 ते 9 तारखे पासूनच कडाक्याची थंडी पडेल.  विदर्भ मराठवाडा कडे 10ते 11 तारखेला थंडी मध्ये वाढ होईल.
या नंतर बंगालचे उपसागरात कमी दाब पट्टे निर्माण होतीलच पणं ते खालचे बाजूला जातील. सध्या देखील एक कमी दाब ॲक्टिव आहे तयार झाला आहेत.

महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमधून थंडीने प्रस्थान केलेलं दिसत असताना महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये पावसाचा येलो अलर्ट जो आहे ते जरी करण्यात आलेला आहे. महाराष्ट्रामध्ये कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस कोसळणार आहे. ते आपल्याला जाणून घ्यायचा आहे. या पावसामुळे शेती पिकाचे मात्र मोठ्या नुकसान होणार आहे.

अवकाळी पावसाने नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याच्या बातम्या समोर आलेले आहेत. नाशिक जिल्ह्यातल्या अनेक भागांमध्ये अवकाळी पावसामुळे कांदा पिकाचा मोठा नुकसान झालेला आहे. त्याचबरोबर ज्या मका काढून पडलेले होत्या त्या भिजल्या आहे. तर शेतात कांदा कापनी काम सुरु असतांना अचानक पाऊस कोसळ्यामुळे कांदा पिक भिजल्यामुळे शेतक-यांचे मोठं नुकसान झाले आहे.

भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रासाठी पावसाचा इशारा दिलेला आहेत. पुण्यामध्ये पावसाच्या सरी कोसळणार आहे. त्याचबरोबर 48 तासांमध्ये कोकण, गोविंद, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्र, पुणे, सातारा, सांगली ,सोलापूर तर मराठवाड्यातील संभाजीनगर, बीड, लातूर, आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये विजेच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे

गोंदिया आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये पावसाने हजेरी लावल्यामुळे गहू हरभरा आणि रब्बी पिकाच मोठा नुस्कान झालेला आहेत. यावर्षी या आलेल्या अचानक पावसामुळे द्राक्ष पिकालाही मोठ्या प्रमाणात फटका बसणार आहे. मध्य महाराष्ट्रामधील काही जिल्ह्यांमध्ये मेग गर्जेनसह पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे.  पुढील तीन दिवस महाराष्ट्रामध्ये पाऊस कोसळणार असल्याने शेतकऱ्यांनी काळजी घेण्याची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!