क्राईमबीड

जनतेचा प्राण हारण करणारे ठाणे आणि गुजरातचे आधुनिक यमदुत

Yamdut of Thane and Gujarat who lost the lives of the people

वेगवान मराठी परळी-अंबाजोगाई (प्रतिनिधी) दि 7 डिसेंबर 2024
गोरगरीब रुग्णांवरील उपचारासाठी आधारस्थान असलेल्या अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयास बनावट औषधींचा पुरवठा करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी ठाणे आणि सुरत (गुजरात) मधील चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

सध्याच्या खाजगी रुग्णालयातून मिळणाऱ्या महागड्या उपचारपद्धतीमुळे गोरगरीब आणि सर्वसामान्य रुग्ण स्वस्त आणि खात्रीपूर्वक उपचारासाठी स्वाराती रुग्णालयास प्राधान्य देतात. एका अर्थाने हे रुग्णालय गोरगरिबांसाठी जीवनवाहिनी आहे.

मात्र या रुग्णालयात महाराष्ट्र शासनाने नेमलेल्या औषध पुरवठा कंत्राटदाराने बनावट औषधीचा पुरवठा केल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या तपासणीत उघड झाले आहे. या प्रकरणी औषधी निरिक्षक मनोज पैठणे यांच्या फिर्यादीवरून सुरेश दत्तात्रय पाटील, मिहीर त्रिवेदी (रा. भिवंडी, जि.ठाणे),द्विती सुमित त्रिवेदी (रा. सुरत) आणि विजय शैलेद्र चौधरी (रा. मिरा रोड ठाणे) या चौघांवर अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर बनावट औषध निर्मिती आणि विक्रीच्या मागे आंतरराज्यीय टोळी असून अनेक राज्यात त्यांचे जाळे पसरले असण्याची शक्यता देखील फिर्यादीत व्यक्त करण्यात आली आसुण बीड जिल्ह्यातील जनतेचे प्राण हारण करण्यासाठी ठाणे आणि गुजरात मधुन आलेल्या यमदुतांना आवर घालण्यासाठी शासण आणि जिल्ह्यातील सर्वच खासदार आमदारांसह सर्वच लोकप्रतिनिधी गप्प का आहेत हा देखील संशयास्पद आणि संशोधनाचा विषय आहे. दरम्यान पुढील तपास एपीआय कांबळे करत आहेत

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!