
वेगवान मराठी प्रतिनिधी केशव डी.मुंडे परळी वैजनाथ-25 मार्च 2025 –परळी वैजनाथ येथील चंदुलाल बियाणी आणि चाळीस चोरांवर 300 कोटीच्या घोटाळ्यातील राजस्थानी मल्टीस्टेट च्या आरोपींवर गुन्हा नोंद करुण घेण्यासाठी परळी शहर पोलीसांनी ठेवीदारांना तब्बल दिड महिणा ताटकळत ठेवले !
परंतु ठेवीदारांच्या लहाण सहाण घटणेवर डोळ्यात तेल घालुण वौच ठेवुण परळीचे पोलीस ठेवीदारांवर गुन्हा दाखल करुण घेण्यासाठी मात्र दिड घंटा देखील वेळ लावत नाहीत ! याचे राज काय आहे ते हळुहळू उघडे पडत आहे !
दोन वर्ष झाले राजस्थानी मल्टिस्टेट चे संचालक ठेवीदारांच्या डोक्यात दगड घालुन भर दिवसा डाका टाकुण पसार झाले तेंव्हा परळीचे पोलीस साखर झोपा काढत होते,परंतु ठेवीदारांच्या बारकुशा चुकीला कायद्याची भिती दाखवुण राईचा पहाड करत आले आहेत आणि सध्या पण तेच प्रताप करत आहेत
कायदा फक्त ज्यांना कोणी वाली आणि ज्यांची कोणी वाणी नाही त्यांच्यासाठीच महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर साहेब यांनी बनवलाय की काय आसे खेदपपुर्वक बोलावे लागतय ! नाही तर मग गरीब श्रिमंत आसा भेदभाव दिसला नसता,
लोकप्रतिनिधीच्या संपर्क कार्यालया सारखे पोलीस स्टेशन आणि नेत्याच्या लाभार्थी कार्यकर्त्यां सारखे पोलीस का वागत आहेत ? हे आता झाकुण राहीले नाही ! आणि परळीकरांसाठी ते नविन पण नाही ! त्यामुळेच कि काय परळीतील बहुतांश नागरीकांच्या शरीरात जन्मदात्या मायबापाचे रक्त नाही तर पुढाऱ्यांचे निष्ठेचे पाणी भरल्या सारखे मुर्दाडपणे आक्काची गुलामी करण्यात धन्यता मानत बसले नसते !
भर दिवसा लुटमार,दिवसा ढवळ्या मुडदे,चोऱ्या,अपहरण,घोटाळे,भ्रष्टाचार, बलात्कार,खोटे गुन्हे,आणि सर्वत्र काही ठरावीक अपात्र लोकांचा नंगानाच सुरु आसताना विकास फक्त मनोरंजनात्मक कार्यक्रमा पुरताच शिल्लक ठेवलेला आसताना देखील जनतेचा स्वाभिमान जाग्रत होत नसेल तर याला दुसरे काय बोलायचे ते तुम्हीच ठरवावे लागेल कारण याचे उत्तर खालील सत्य घटणांवर आधारित उपस्थित केलेल्या खालील प्रश्नांवरुण तरी समजेल 👇
ठेवीदारांवर कायदा हातात घेण्याची वेळ कोणामुळे आणि का आली ?
दिड वर्षे उलटुण गेले पोलीस आरोपींना का अटक करु शकत नाहीत ?
शिक्षकाने शिक्षक म्हणुन राहिले पाहीजे त्याने शाळेचा मालक बनुण ठेवीदारांना ठेवी परत करण्याचा शब्द का दिला ?
आणि दिला तर मग पाळत का नाही ?
ठेवीदारांनी रागाच्या भरात चार दोन थापडा मारलेल्या सहन होत नाहित मग परळीतील 5 ठेवीदारांचा मृत्यू झालाय त्याचे काय ?
हाजारो ठेवीदारांच्या जिवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला आसताना फरार अरोपीनां थेट मदत करणे हा गुन्हा नाही का ?
वादग्रस्त प्रकरणातील शाळेवर पाय रोऊण थांबाण्या मागचा प्रिंसिपल बीपी सिंगचा हेतु काय ?
जर मंदाकिनी बंडु मुंडे यांची नेमणुक व्यवसाथपक म्हणुन केली आहे तर मग जमा झालेली रक्कम ठेवीदारांना अश्वासित करुण मल्टिस्टेट च्या खात्यात जमा करा म्हणून व्यवस्थापक सांगत आसताना देखील
बिपी सिंग त्यांचे आदेश का पाळत नाही ? राजस्थानीची मल्टिस्टेट आणि राजस्थानी पोद्दार स्कुल या दोन्हीचे संचालक एकच आहेत..
सदरील राजस्थानी पोद्दार स्कुल या फरार आरोपींचीच आहे ! आणि या संचालकांनी मल्टिस्टेटच्या ठेवीतुन पोद्दार स्कुल उभी केलेली आहे एवढच नाही तर स्वताच्या नावावर मल्टिस्टेट व पतसंस्थेतील 60 कोटी पेक्षा जास्त कर्ज उचलेले आहे…
मग एवढं शेन खाऊण देखील अटक होण्या ऐवजी हे संचालक मजे मारीत पर्यटन करीत राजरोष फिरत आहेत आणि त्या आरोपींना या शाळेतील पैश्याचा पुरवठा बिपी सिंग करत आहे मग गुन्हेगाराला मदत करणं हा गुन्हा ठरत नाही का ?
ठेवीदारांचा लढा हा संचालक मंडळा विरुद्ध आहे मग बिपी सिंग मध्ये येण्याचे नेमके कारण काय ? झारखंड मधुन येऊण ठेवीदारां वर दादागिरी हा कोणाच्या जिवावर करतोय
आणि ठेवीदारांच्या विरोधात या बाहेरच्या राज्यातील माणसाला ठेवीदारां वर गुन्हे दाखल करण्यासाठी कोण मदत करतय हे न समजण्या पुरते खुळे ठेवीदार नक्कीच नाहीत !
आमच्यावर गुन्हे दाखल केल्याने संघर्ष थांबेल हा संचालक मंडळाचा भ्रम आहे. ठेवीदारांचा एक ना एक रुपया मिळेपर्यंत हा लढा थांबणार नाही. कितीही गुन्हे दाखल करा.. काही फरक पडणार नाही..

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.








