क्राईम

परभणी प्रकरण चिघळले संतप्त जमावा कडुन आज जाळपोळ आणि तोडफोड

The Parbhani case sparked arson and vandalism in Kaduna by angry mobs

केशव मुंडे वेगवान मराठी परभणी दि 11/12/24-

परभणी प्रतिनिधी- मंगळवार दि 10 12 24 रोजी परभणी शहरातील ड्रॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास समोरील संविधानाच्या प्रतिकृतीला दगड मारून परभणी शहरातील माथेफिरू समाजकंटकाने संविधानाची प्रतिकृती फोडली होती,ही निंदनिय घटणा वाऱ्यासारखी पसरली त्यामुळे परभणी जिल्ह्यासह मराठवाडय़ातील विविध भागात या घटणेचे तिव्र पडसाद उमटत आहेत.

परभणी शहरातील परस्थिती पाहता कलम 144 लागु होऊ शकते घटणे नंतर परभणी पोलीसांनी तात्काळ माथेफिरू आरोपीस अटक केली आसली तरी नागरीकांचा राग शांत होताना दिसत नाही आज परभणी शहरातील मुख्य ठिकांणी जाळपोळीच्या घटणा दिवसभर सुरु असून रेल्वे रोको करुण काल नागरीकांनी पटरी वर उतरुण आंदोलन केले होते,..

10 तारखेला घटणा  घडलेल्या क्षणा पासुण परभणी शहरात तनावाचे वातावरण निर्माण झाले असुण आंदोलन,निषेध मोर्चा नंतर आज संतप्त झालेल्या आंबेडकरवादी समाजातील महिला व नागरिकांनी आज परभणी जिल्हाधिकारी कार्यालय फोडले असुण परभणी शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे,राजकीय नेते,लोकप्रतिनिधी आणि पोलीस  प्रशासण संतप्त जमावा समोर हतबल झालेले आहे,घटणे ची तिव्रता पाहता हे प्रकरण चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे ,परभणी,बीड,नांदेड,हिंगोली,लातुर जालना,संभाजीनगर या परभणी शेजारील मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये देखील या घटणेचे पडसाद उमटत आहेत, पहा 👇

उद्या सोनपेठ बंदची हाक— वरील प्रकरणी सेवेत निवेदन सादर करण्यात येते की, मंगळवार दि. १० डिसेंबर २०२४ रोजी दुपारी ०४.३० वाजण्याच्या सुमारास परभणी शहरातील संविधानाचे शिल्पकार महामानव, बोधिसत्व, प्रकांडपंडीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिकृती पुतळ्यासमोर असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीला एका माथेफिरू समाज कंटकाने दगड मारून संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केली असून ही घटना अत्यंत निंदनीय व निषेधार्थ आहे व समाजातील जातीय सलोखा नष्ट करणारी आहे व भारत देशाच्या संविधानाची जाणीवपुर्वक विटंबना करून तमाम भारतीयांच्या भावना दुखविणारी आहे. म्हणुन आपण या प्रकरणी संबंधित आरोपीवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा व जातीय सलोखाव शांतता नष्ट करून पाहणा-या समाज कंटकावर गुन्हे दाखल करण्यासाठी उद्या दि.१२/१२/२०२४ रोजी सोनपेठ शहर व ग्रामीण भाग बंद ठेवण्यासाठी म्हणुन आम्ही सर्व आबेडकरी समाज आपल्याला निवेदन सादर करीत आहोत.म्हणुन आपण निवेदनात नमूद केल्याप्रमाणे त्वरीत कार्यवाही करावी, ही विनंती.

गंगाखेड मध्ये तिव्र आंदोलन आणि निदर्शने करत आज गंगाखेड येथे कडकडीत बंद करण्यात आले –

गंगाखेड शहर शांततेत कडकडीत बंद.
समाजाने शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन..
परभणी येथील संविधानाच्या प्रतिकृतीच्या विटंबनेचा जाहीर निषेध करण्यासाठी आज सर्व आंबेडकरी समाज एकवटला होता. शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले.

यावेळी शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून जोरदार घोषणाबाजी करत भगवती मंदीरापर्यंत मोर्चा काढण्यात आला मोर्चा समारोप डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर करण्यात आला.या प्रकरणातील आरोपीस व आरोपीच्या मागे असलेल्या खऱ्या गुन्हेगारांना कडक शिक्षा करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे प्रशासनाकडे करण्यात आली.तसेच आंबेडकरी समाज बांधवांनी शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले.सर्व आंबेडकरी समाज बांधवांच्या वतीने या मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर, तहसिलदार श्रीमती उषाकिरण शृंगारे व पोलीस निरीक्षक दिपककुमार वाघमारे यांना देण्यात आले.

परळी येथे निदर्शने करण्यात आले 

परळी शहरातील नागरीकां कडुण आज परभणी येथील ड्रॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान प्रतिकृती विटंबना प्रकरणी तिव्र निदर्शने करण्यात आली असुण संबंधीत समाजकंटकावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात याव अशी मागणी करण्यात आली आहे तर आरोपी विरोधात घोषणा देत या घटणेची तिव्र शब्दात निंदा करण्यात आली आहे दरम्यान परळी शहरातील आंबेडकर वादी समाज या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होता…

 

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!