बीड येथील संतोष देशमुख प्रकरणातील तिसरा आरोपी प्रतिक घुले अटक
Pratik Ghule, the third accused in the Beed Sarpanch Santosh Deshmukh case, was arrested

केशव मुंडे परळी वेगवान मराठी 11 /12 /24 बीड- जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या मस्साजोग खून प्रकरणातील तपासाचे चक्र गतीने फिरवल्याचे दिसून येत आहे बीड पोलिसांनी मस्साजोगचे सरपंच संतोष पंडीतराव देशमुख यांच्या हत्याकांड प्रकरणात एक पाउल पुढे टाकले आसुण. या प्रकरणातील आणखी एका आरोपीस बीड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने पुण्यात बेड्या ठोकल्या आहेत, प्रतिक भीमराव घुले -वय २५, रा. टाकळी, ता. केज, असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
खून केल्यानंतर प्रतिक घुले पुण्याच्या दिशेने रवाना झाल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या अचूक माहितीच्या आधारे पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी यापूर्वी जयराम माणिक चाटे (वय २१ रा. तांबवा ता. केज), महेश सखाराम केदार (वय २१ रा. मैंदवाडी ता. धारुर) या दोन आरोपींना अटक केली होती.
आतापर्यंत एकूण तीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले आहेत. दरम्यान, प्रतिक घुले यास आजच बुधवारी न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती आहे.
©wegwan marathi parli.v.beed keshavmunde2014@gmail.com@

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.