नाशिकः मुंबई-आग्रा महामार्गावर बससह चार वाहनाचा एकत्र भीषण अपघात

वेगवान मराठी
नाशिक, ता. मुंबई- आग्रा महामार्गावर चार वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. हा अपघात दोन बस व दोन ट्रक सह झाला आहे. यामध्ये 13 मेंढ्या मृत्यमुखी पडल्या आहे. राष्ट्रीय मुंबई आग्रा महामार्गावर चांदवड जवळील राहुड घाटाच्या पायथ्याजवळ ही घटना घडली आहे.
ठाणे आगाराची असलेली बस अतिवेगात असल्यामुळे चालकाचा नियंत्रण सुटल्यामुळे बस ने तेरा मेंढ्या चिडत हा भीषण अपघात घडला. बसने समोर रस्ता ओलाडणा-या मेँढ्यांना चिरडून टाकले.
यावेळी बस प्रवाशांनी पूर्णता भरलेली होती, याच दरम्यान दुसरी बस या अपघातामुळे थांबली असता, मागून येणा-या वीटाच्या ट्रकने तिला पाठीमागून जोरदार घडक दिली. तर याचवेळी दुसरी ट्रक उभी होती तिलाही याची धडक बसली. याचवेळी एकत्र विचित्र असा अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प झाली होती. या अपघातामध्ये काही प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे.
