लाडक्या बहिणीसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा

वेगवान नाशिक
मुंबई, ता. महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण ही योजना किंग मेकर योजना म्हणून समोर आलेली आहे या योजनेमध्ये महायुती सरकारला घवघवीत यश मिळण्यासाठी सर्वात मोठा योगदान ठरलेला आहे,
मात्र या लाडक्या बहिणींना पैसे कधी मिळणार म्हणजे या लाडक्या बहिणींचा डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.
निवडणुका लागल्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती या अगोदरच पैसे टाकण्यात आलेले होते मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी दिलेली आहे या लाडक्या बहिणींच्या खात्यावर कधी पैसे मिळणार आहे याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे.
डिसेंबर महिन्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे पडतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं हे पैसे पडण्यासाठी तुम्हाला नवीन वर्षाची वाट पहावी लागणार नाही.
तसेच ज्या लाडक्या बहिणीच्या नावाखाली ज्या लोकांनी खोटी कागदपत्रे सादर करून तसेच सरकारची दिशाभूल केलेली आहे अशा बहिणींच्या खात्यावर मात्र पैसे जाणार नाही असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितला आहे
