क्राईमबीड

संतोष देशमुखांच्या मृत्यूचे खरे कारण समोर,सुरेश धसांचा डोळे जाळल्याचा आरोप काल्पनीक

Santosh Deshmukh's death due to haemorrhage shock due to multiple injuries, postmortem reports

वेगवान मराठी क्राईम रिपोर्टर बीड – सरपंच संतोष देशमुख यांच्या मृत्यूचे खरे कारण पोस्टमार्टेम रिपोर्टमुळे समोर आले आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचा पोस्टमार्टम रिपोर्ट्स (शवविच्छेदन) अहवाल जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी बीड जिल्हाचे पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांना सादर केला आहे.

संतोष देशमुख यांचे डोळे जाळण्यात आल्याच्या चर्चा सुरू होत्या. परंतु देशमुख यांच्या छाती, हात-पाय, चेहरा, डोके या भागात मारहाण करण्यात आली आहे. त्यांच्या चेहऱ्यावर आणि डोळ्याचा भाग मारहाणीमुळे काळा-निळा पडल्याने ही चर्चा सुरू झाली,मस्साजोग येथे संदीप क्षिरसागर आणि सुरेश धस या दोघांनी भेट दिल्यानंतर लेझरणे किंवा लाइटरणे डोळे काढुण मारल्याचे दावे केले होते

आ.सुरेश धस व आ संदिप क्षिरसागर यांनी डोळे जाळुण मारल्याचे आरोप निघाले काल्पनीक –

(मुख्य कारण:– HAEMORRHAGE SHOCK DUE TO MULTIPLE INJURY ) संतोष देशमुख यांचा मृत्यू जबर मारहाणीमुळे झालेला असून त्यांच्या शरीरावर मुकामार दिसत आहे. त्यांचे डोळे काढणे किंवा लेझरने डोळे जाळणे या आरोपाला शवविच्छेदन अहवालात दुजोरा देण्यात आलेला नाही. पाठ, डोके व संपूर्ण शरीरावर मुकामार व जखमा दिसून आल्या आहेत.Santosh Deshmukh’s death due to haemorrhage shock due to multiple injuries, postmortem reports मध्ये यामुळे मृत्यु झाल्याचे मेंशन करण्यात आले आहे

◆wegwan marathi parli beed maharasthra MOBILE. 8888 387 622◆

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!