महाराष्ट्रातील एवढ्या अधिका-याच्या धडाधड बदल्या

वेगवान मराठी/ मारुती जगधने
मुंबई, ता. 24 डिसेंबर 2024- महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी सूत्रे हाती घेताच राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तथा आयएसआय अधिकाऱ्यांचा बदल्या सत्र सुरू झाले यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ॲक्शन मोडवर असल्याचे दिसून आले.
महाराष्ट्र राज्यात अलीकडेच वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने या बदल्या जाहीर केल्या आहेत.
मुख्य बदल्या खालीलप्रमाणे आहेत:
अनिल डिग्गीकर: बेस्टचे महाव्यवस्थापक पदावरून दिव्यांग विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी बदली.
हर्षदीप कांबळे: बेस्टचे नवीन महाव्यवस्थापक म्हणून नियुक्ती.
राधाकृष्णन: मुख्यमंत्री कार्यालयातील सहसचिव पदावरून महाजेनकोच्या अध्यक्षपदी बदली.
अनबाल्गन: महाजेनकोचे अध्यक्ष पदावरून उद्योग विभागाच्या सचिवपदी बदली.
संजय दैने: गडचिरोलीचे जिल्हाधिकारी पदावरून नागपूर टेक्सटाईल आयुक्तपदी बदली.
अविशांत पांडा: गडचिरोलीचे नवीन जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती.
राहुल कर्डिले: वर्ध्याचे जिल्हाधिकारी पदावरून नाशिक महापालिका आयुक्तपदी बदली.
सी वनमाथी: राज्य कर सहआयुक्त पदावरून वर्ध्याच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती.
संजय पवार: चंद्रपूर जिल्हा परिषदेचे सीईओ पदावरून राज्य कर सहआयुक्त पदावर नियुक्ती.
विवेक जोन्सन: चंद्रपूरचे नवीन जिल्हा परिषद सीईओ म्हणून नियुक्ती.
अण्णासाहेब चव्हाण: पुणे विभागीय महसूल उपायुक्त पदावरून महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेच्या सीईओपदी बदली.
गोपीचंद कदम: सोलापूर स्मार्ट सिटीचे सीईओ म्हणून नियुक्ती.
या बदल्यांमुळे राज्यातील प्रशासकीय व्यवस्थेत महत्त्वपूर्ण फेरबदल झाले आहेत.
