क्राईमखेळछत्रपती संभाजी नगरपुणेबीडमहाराष्ट्र

थर्मल पावर स्टेशनच्या पांढऱ्या राखेचे रक्तरंजीत काळे अर्थकरण

अंजली दमाणीया यांनी उघडले परळीच्या राखेचे रक्तरंजीत अर्थकरणाचे काळे कारणामे

वेगवान मराठी परळी -केशव मुंडे दि 1-1-2025-मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खुन प्रकरणा मुळे बीड जिल्ह्यातल्या गुन्हेगारांचे नवनविन प्रताप रोज एक एक उघड होत आहेत,बीड जिल्ह्यातील उधोग व्यवसायाचे 12 का वाजले आहेत,नविन व्यवसायीक जिल्ह्यत गुंतवणूक करण्यासाठी का धजावत नाहीत,चांगले आधिकारी जिल्ह्यत येण्यास का टरकतात,जिल्ह्यात बेरोजगारीचे प्रमाण का वाढले आहे,प्रदुषणामुळे लोकांचे आरोगय धोक्यात का आले आहे,जिल्ह्यातील किशोर वयीन तरुण गुन्हेगारी क्षेत्राकडे का वळताहेत,बीड जिल्ह्यातील सामान्य नागरीक आणि शेतकरी देशोधडीला कशामुळे लागले आहेत,साधुसंतांचा,आदर्श राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचा आणि कष्टकरी,ऊसतोड मजुरांचा,वारकरी सांप्रदायाचा जिल्हा म्हणुण ओळख असलेल्या बीड जिल्ह्याला गुन्हेगारांचा जिल्हा म्हणुण ओळख निर्माण करण्यात कोणाचे लाभतेय योगदान, 👇

सामाजीक कार्यकर्त्या अंजली दमाणीया यांनी उदाहारण म्हणुण समोर आणलेले परळी थर्मल पावर स्टेशन येथील राखेचे रक्तरंजीत अर्थकरण -👇

काल Mahagenco Thernal plant येथे जाऊन राखेचा विषय समजून घेतला.
प्रचंड दशात, गुंडगिरी करून इथून बेकायदेशीर रित्या राख नेली जाते.

खाली दिलेली लिस्ट, ही १७ कंपन्यांनची आहे ज्यांनी टेंडर भरुन Bottom Pond Ash उचलण्याची परवानगी घेतली आहे पण राजकीय वर्धास्त असलेल्या गुंडांमुळे त्यांना आत देखील घुसू दिले जात नाही.

Fly Ash उचलण्यासाठी Prepaid पद्धतीने contract आहे त्यात ११ सीमेंट कंपन्या आहेत ज्यांना ८०% माल दिला जातो. २०% Fly Ash ही छोट्या कंपन्यांना दिली जाते.थर्मल पावर स्टेशन परळी येथील राखेचा काळा बाजार

सगळा गौडबंगाल आणि प्रचंड दहशत ही Bottom Ash मधे होत आहे. पोलिसांना कित्येक वेळा तक्रार देऊन देखील काहीच कारवाई नाही. एकदा तर ४०० गुंड घेऊन दहशत निर्माण केली गेली होती आणि संबंधीत कंपणीच्या आधिकारऱ्यांनी विनवणी करुन सुद्धा एकही पोलिस तिकडे फिरकले पण नाहीत. या काळ्या गोरख धंदे करणाऱ्यांना इतका मोठा राजकीय वर्धास्त आहे

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!