परळी येथील राख माफियांनी घेतला आणखी एका सरपंचाचा बळी
Another sarpanch was killed by the ash mafia in Parli

वेगवान मराठी परळी -K.D.MUNDE दिनांक 12 जानेवारी 2025 परळी धर्मापुरी मार्गावरील मिरवट फाट्यावर दि 11-1-2025 शनिवार च्या रात्री राखेची अवैध वाहतूक करणाऱ्या हायवा वाहणांने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकी वरुण प्रवास करणारे सौंदना गावचे विद्यमान सरपंच अभिमन्यु क्षिरसागर यांचा जागीच मृत्यू झाला …
एवढा मोठा अपघात झाला आसताना सदरील वाहनचालकांने मदत करण्याचे सोडुण त्या ठिकाणाहुण पळ काढल्याचे सांगीतले जात आहे.यावरुण हा अपघात की मुद्दामहुण केलेला घातपात आसा प्रश्न उपस्थित होतो,मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सदरील वाहण हे परळी पासुण हाकेच्या अंतरावर असलेल्या आणि राखेचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या दाऊतपुर येथील असल्याचे बोलले जात आहे
अपघात घडलेल्या घटनस्थळी सदरील घटणेतील वाहणास लावलेली शासणाची नंबर प्लेट तुटुण पडलेली आढळून आली आसुण एम एच 44 यु 2117 हा त्या वरील नंबर आसुण समाधान बीडगर या नावाने सदरील हायवा मालक मालक असल्याचे दिसत आहे,
बातमी प्रसारीत होईपर्यंत पोलीसां कडुण काय काररवाई करण्यात आली याची माहिती प्राप्त झालेली नाही मात्र मयत सरपंच अभिमन्यु क्षिरसागर यांचा मृतदेह हा परळी येथील शासकीय रुग्णालयात आसल्याचे समजत आहे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.