क्राईमछत्रपती संभाजी नगरबीड

MPDA कायद्या अंतर्गत बीड-नगरच्या वाळुमाफीयाला थेट हर्षूल जेलची हवा

Sand mafia Akshay Dhakne directly in Harshul Jail

(MPDA कायद्याअंतर्गत बीड व अ.नगर जिल्ह्यात दहशत माजविणाऱ्या वाळु माफियाची हर्सल कारागृहात रवानगी)

वेगवान मराठी बीड केशव मुंडे दिनांक-29 जानेवाली 2025- बीड जिल्हयातील सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्हयाचे पोलीस अधीक्षक श्री.नवनीत कौवत यांनी जिल्हयाची धुरा सांभाळल्या पासुन शर्तीचे प्रयत्न चालवले आहेत.

बीड जिल्ह्यातील गुंडगिरीचे व गुन्हेगारीचे व अवैैध धंदयांचे समूळ उच्चाटन करण्याचा दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून MPDA कायद्या अंतर्गत बऱ्याच गुन्हेगारांवर व गुंडांवर कार्यवाही करण्याचे योजिले आहे.

त्या अनुषंगाने सपोनि पो.स्टे. चकलंबा यांनी दिनांक 03.09.2024 रोजी इसम नामे अक्षय विठ्ठल ढाकणे वय 30 वर्ष रा. मुंगी ता. शेवगांव जि. अ.नगर वाचे विरुद्ध MPDA कायद्याअंतर्गत स्थानबद्ध करण्या बाबतचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक बीड यांच्या मार्फतीने मा. जिल्हादंडाधिकारी साहेव बीड यांना सादर केला होता.

सदर स्थानबध्द इसमा विरुध्द अहिल्या नगर व बीड जिल्हयातील विविध पो.स्टे. ला खुनाचा प्रयत्न करणे, दरोडा टाकणे, जाळपोळ करणे, गौण खनिज बाळ चोरी करणे, बाळ चोरीचा प्रयत्न करणे, सरकारी कामांत अडथळा आणने, सरकारी नौकरावर हल्ला करणे, मारहाण करणे, जिवे मारण्याच्या धमक्या देणे या व अशा गंभीर स्वरुपाचे एकुण 10 गुन्ह्यांची नोंद पोलीस अभिलेखावर आहे.

सदरील इसम हे शरीरा विरुध्दचे व माला विरुध्दचे गंभीर गुन्हे करून गोदावरी नदी पात्रातील वाळु गौण खनिज याची चोरी करून साठा करून चढ़या भावाने विक्री करत असल्याने पोलीसांची त्याचेवर बऱ्याच दिवसांपासून करडी नजर होती.

तसेच सदर इसमाने आपले वर्तन सुधारावे म्हणुन यापूवी CrPC 110 प्रमाणे 02 वेळा प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती.

परंतु सदर इसम प्रतिबंधक कारवाईस न जुमानता पुन्हा चढत्या क्रमाने चालु गौण खनिज चोरीचे गुन्हे करण्याचे चालुच ठेवून होता.

त्यांची तलवाडा, चकलंवा गेवराई व नगर जिल्ह्यातील शेवगांव पाथर्डी तालुक्यात दहशत आहे. त्यांचे विरुध्द सर्व सामान्य लोक फिर्याद अथवा साक्ष देण्यास समोर येत नाहीत.

तो सर्वसामान्य लोकांना व शेतकऱ्यांना त्रास देवून दहशत निर्माण करून बाळु चोरीचे गुन्हे करत होता.

सदर प्रकरणात श्री.अविनाश पाठक जिल्हाधिकारी तथा दंडाधिकारी यांनी दिनांक 19.09.2024 रोजी सदर प्रकरणाच्या अनुषंगाने एम.पी.डी.ए. कायद्याअंतर्गत आदेश पारीत करून सदर इसमास तात्काळ ताब्यात घेवून हर्मुल कारागृह छ.संभाजीनगर येथे हजर करून स्थानबध्द करणे बाबत आदेश पारीत केले होते.

त्यानंतर पोलीस अधिक्षक बीड यांनी सदर इसमास तात्काळ ताब्यात घेवून कार्यवाही करण्याच्या सुचना सपोनि चकलंबा व पो.नि. स्थागुशा बीड यांना दिले होते

तेव्हांपासून पो.स्टे. चकलंबा व स्थागुशा पोलीस नमुद इसमाचा शोध घेत होते.तो फरार झालेला असल्याने मिथुन येत नव्हता व अटक टाळण्यासाठी स्वतःचे अस्तित्थ लपवुन वावरत होता.

पो.नि.श्री. उस्मान शेख यांनी गोपनिय बातमीच्या आधारे नमुद प्रस्तावित स्थानबध्द दि. 29.01.2025 रोजी बालमटाकळी ता.शेवगांव परीसरातून 18.30 वा. ताब्यात घेतले असून, पो.स्टे. चकलंबा येथे हजर केले आहे. पो.स्टे. चकलंबा येथे सदर इसमास कायदेशीररीत्या ताब्यात घेऊन योग्य पोलीस बंदोबस्तात हसुल कारागृह, छ. संभाजीनगर येथे हजर करून स्थानबध्द करण्याची प्रक्रिया चालु आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. नवनीत कौवत, अपोअ चीड, श्री सचिन पांड़कर, यांचे मार्गदर्शनाखाली पो. नि. श्री उस्मान शेख स्थानुशा बीड यांचे सह सपोउपनि अभिमन्यु औताडे, संजय जायभाये, पोना गणेश हगे नेमणुक स्थागुशा बौड यांनी केलेली आहे.

भविष्यातही वाळुचा चोरटा व्यापार करणारे, अवैद्य  गुटका विक्री करणारे तसेच जिवनावश्यक वस्तुंचा काळाबाजार करणारे व्यक्ती यांचेवर व दादागिरी करणाऱ्या व खंडणी बहादर धोकादायक गुंडावर जास्तीत जास्त MPDA कायदयाअंतर्गत कठोर कारवाई करण्याचे संकेत पोलीस अधीक्षक श्री नवनीत कौवत यांनी दिले आहेत.

काय आहे MPDA ACT आणि कोणत्या गुन्ह्यात लावला जातो, 👇
महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ डेंजरस अ‍ॅक्टिव्हिटी (एमपीडीए) हा कायदा, झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले, औषधीद्रव्यविषयक गुन्हेगार आणि धोकादायक व्यक्तींच्या विघातक कृत्यांना आळा घालण्यासाठी करण्यात आला आहे. या कायद्यानुसार, आरोपीला एका वर्षासाठी तुरूंगवास करण्यात येतो. 
एमपीडीए कायद्याबद्दल अधिक माहिती: 

  • हा कायदा 1981 मध्ये करण्यात आला होता.
  • या कायद्यात सुधारणा 1996 मध्ये करण्यात आली होती.
  • या कायद्यानुसार, सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी धोकादायक व्यक्तींना ताब्यात घेता येते.
  • या कायद्यानुसार, वाळू तस्कर आणि जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई केली जाते.
  • या कायद्यानुसार, दरोडेखोर आणि धोकादायक व्यक्तींवर कारवाई केली जाते.
  • वेगवान मराठी बीड संपर्क 8888 387622 

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!