विभागीय पोलीस महानिरिक्षकांनी घेतला बीड पोलीसांच्या कामगीरीचा आढावा
A review meeting of the police force under the joint presence of the Divisional Special Commissioner of Police and the Superintendent of Police of Beed

प्रेस नोट दि. 29/01/2025 विभागीय विषेश पोलीस महानिरीक्षक व बीडच्या पोलीस अधीक्षकांनी घेतला पोलीस ठाण्यांच्या कामगीरीचा आढावा तसेच चांगली कामगीरी बजावणाऱ्या अधिकारी आणि अंमलदारांचा केला सत्कार केला तर बीड जिल्ह्यातल्या चालु घडामोडीवर संबंधितांना खालील सुचना देण्यात आल्या आहेत 👇
वेगवान मराठी बीड केशव मुंडे –दिनांक 29/01/2025 रोजी छत्रपती संभाजीनगर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. वीरेन्द्र मिश्र व पोलीस अधीक्षक, बीड श्री. नवनीत कवित यांनी बीड जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी, शाखा प्रभारी अधीकारी यांची गुन्हे आढावा बैठक घेवून पोलीस ठाणे कामकाजाचा आढावा घेतला.
त्यामध्ये बीड जिल्हयात दाखल खुन, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, व इतर दाखल गुन्हे तसेच दारु, जुगार,अवैध वाळू उपसा वाहतुक, गुटखा, अवैध जनावरांची वाहतुक,
यासंबंधाने दाखल व उघड गुन्ह्यांची आकडेवारीची माहीती घेवुन विनाउघड गुन्हे उघड करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करण्याच्या सुचना देण्यात आल्या.
बीड जिल्ह्यात सन 2024 या वर्षात खुनाचे 40 गुन्हे दाखल असुन सर्व गुन्हे उघड करण्यात बीड पोलीसांना यश आले आहे.
खुनाचा प्रयत्न करणे 192 गुन्हे दाखल असून 192 गुन्हे उघड आहेत. तसेच दरोड्याचे 21 गुन्हे दाखल असून 21 गुन्हे उघड करण्यात पोलीसांना यश आले आहे. तसेच जबरी चोरीचे 72 गुन्हे दाखल असुन 51 गुन्हे उघडकीस आणले आहेत.
बीड जिल्ह्यात 1857 दारुच्या कारवाया केल्या असून रुपये 2,56,66,269/- चा मुद्देमाल जप्त केला आहे. तर जुगाराच्या एकूण 528 कारवाया करून 48,24,236/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे बीड जिल्ह्यात NDPS च्या एकूण 16 कारवाया करुन 1,28,59,551/- रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे.
यावेळी सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना 2024 च्या तुलनेत अधिक सक्रिय व भरीव काम करण्यासाठी सर्व गुन्ह्यांची निर्गती, डिटेक्शन, अवैध धंद्यांचे समुळ उच्चाटन, समन्स वारंट बजावणी, फरार व पाहीजे असलेले आरोपी यांचा शोध व आरोपी अटकेसाठी उद्दीष्ट ठरवून देण्यात आले.
तसेच कोणत्याही परीस्थीतीत अवैध धंदे चालु द्यायचे नाही अशा स्पष्ट सुचना मा.पोलीस महानिरीक्षक श्री. वीरेन्द्र मिश्र व पोलीस अधीक्षक श्री. नवनित कॉवत यांनी सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना दिल्या.
तसेच मा. विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. वीरेन्द्र मिश्र यांनी जिल्हयातील सर्व उपविभागीय पोलीस अधीकारी यांनी केलेले तपास, उपविभागीय पोलीस अधीकारी यांनी केलेल्या अवैध दारु, जुगार, अवैध वाळू उपसा व वाहतुक, अवैध गुटखा यासंबंधाने आढावा घेतला. तसेच उपविभागीय पोलीस अधीकारी यांनी किती गावांना भेटी दिल्या या संबंधानो आढावा घेतला.
त्याचप्रमाणे पीलीस ठाणे प्रभारी अधीकारी यांनी स्वतः किती गुन्ह्यांचा तपास केला. किती गुन्हयांच्या घटनास्थळाला भेटी दिल्या.
पोलीस ठाण्यात दाखल होणाऱ्या किती गुन्हयात तपास अधीकारी यांना सुचना दिल्या. किती गावांना भेटी दिल्या. याबाबत आढावा घेतला.
त्याचप्रमाणे पोलीस ठाणे स्तरावर प्रलंबीत असलेल्या लकार अजर्जासंबंधाने आढावा घेण्यात आला.
तसेच स्थानीक गुन्हे शाखा यांनी गुन्हे शोधसाठी केलेल्या कारवायांचा तसेच केलेल्या अवैध धंद्यांवरील कारवाया व इतर कामकाजाबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला.
त्याचप्रमाणे जिल्हा विशेष शाखा यांचा आढावा घेतांना जिल्हा विशेष शाखेने निर्गती केलेले पारपत्र, चारीत्र्य पडताळणी व इतर कामकाजाचा आढावा घेण्यात आला.
पोलीस स्टेशन व उपविभागीय पोलीस अधीकारी यांचे कार्यालयाचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी सविस्तर मार्गदर्शन केले.
दाखल गुन्ह्यांची उकल करणे, गुन्ह्यांना आळा घालणे व कायदा व सुव्यवस्था आबाधीत राखणे हे आपले प्रमुख कर्तव्य असल्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी सांगीतले.
तर पोलीस विभाग शीस्त प्रिय विभाग असल्याने आपल्याला ‘खाकी’ म्हणुन वेगळी ओळख आहे.
त्यामुळे आपण कोणाच्याही दबावाला बळी न पड़ता निर्भीड व निष्पक्षपणे काम करावे,असा सकारात्मक विश्वास उपस्थीत अधीकारी यांचेत निर्माण केला.
त्याच प्रमाणे मागील महीन्यात उत्कृष्ट कामगीरी करणारे पोलीस ठाणे माजलगांव शहर, अंभोरा, पिंपळणेर, बीड शहर, पेठ बीड, अंबाजोगाई शहर, युसुफ वडगांव, बीड ग्रामीण, स्थागुशा, आयटी सेल, मोटार परीवहन विभाग येथील अधिकारी व अंमलदार यांचा प्रशस्तीपत्र देवून सन्मान करण्यात आला.
यापुढे प्रत्येक पोलीस स्टेशन व शाखेतील उल्लेखनीय कामगीरी करणारे अधिकारी अंमलदार यांचा प्रत्येक गुन्हे आढावा बैठकीत सन्मान करण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक यांनी सांगीतले.
तसेच विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. वीरेन्द्र मिश्र यांना गुणवत्तापुर्ण सेवेसाठी राष्ट्रपती सन्मानचिन्ह प्राप्त झाल्याने त्यांचा बीड जिल्हा पोलीस दलातर्फे यथोचीत सत्कार करण्यात आला.
तसेच विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. वीरेन्द्र मिश्र व पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काँवत यांनी बीड जिल्ह्यात चालु असलेले सौर ऊर्जा प्रकल्प, पवन ऊर्जा प्रकल्पाचे अधिकारी यांची बैठक घेवून त्यांच्या प्रकल्पाच्या अनुषंगाने मावेजा संबंधाने तसेच जमीन अधिग्रहण संबंधने महाराष्ट्र शासनाने काढलेल्या शासन निर्णया प्रमाणे कारवाई करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
तर विणाकारण अडवणुक करन खंडणी मागणाऱ्या इसमांविरुद्ध पोलीस स्टेशन येथे तक्रारी करण्याच्या सुचना प्रकाल्पाचे अधिकारी यांना देण्यात आल्या.
तसेच मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी राज्य प्रशासकीय यंत्रणेसाठी आखून दिलेल्या 7 कलमी कार्यक्रमाचा आढावा मा. विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. वीरेन्द्र मिश्र यांनी आढावा घेतला.
पोलीस अधीक्षक श्री. नवनीत कॉवत यांनी चांगली कामगीरी करणाऱ्या अधिकारी व अंमलदारांचा सत्कार केल्याने अधिकारी व अंमलदार यांचेत सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचे दिसुन आले.
प्रत्येक पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांनी त्यांचे पोलीस ठाणे स्तरावर चांगले काम करणारे अधिकारी अंमलदार यांचा सत्कार करुन त्यांना चांगल्या कामगीरी करण्यासाठी प्रेरीत करावे असे पोलीस अधीक्षक श्री.नवनीत कॉवत यांनी सांगीतले.
सदर बैठकीस मा. विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. वीरेन्द्र मिश्र, पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिड़के, जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी उपस्थित होते…
वेगवान-मराठी बीड-छ.संभाजीनगर मराठवाडा जाहिराती साठी संपर्क -8888 387 622

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.