बीड

DY SP विश्वंभर गोल्डे यांना पत्रकारांशी गैरवर्तन करणे भोवले

Beed's DY SP Vishwambhar Golde accused of misbehaving with journalists

डीवायएसपी विश्वांभर गोल्डेंचा पुन्हा पत्रकारांसमोरच तोरा, पत्रकारांची एसपींकडे तक्रार
– गोल्डेंवर सुरक्षेची जबाबदारी न देण्याचा एसपींचा निर्णय
वेगवान मराठी प्रतिनिधी । बीड केशव मुंडे
दि.30 : बीडचे उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वांभर गोल्डे यांनी आज पुन्हा एकदा आपला तोरा पत्रकारांवरच गाजवला आहे.

जिल्हा नियोजन समितीची बैठक आटोपून पालकमंत्री अजितदादा पवार समाजकल्याणच्या गेटमधून बाहेर पडत असतानाच त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या डीवायएसपी विश्वांभर गोल्डेंनी पत्रकारांशी असभ्य वर्तन करीत त्यांना अरेरावीची भाषा वापरली.

त्यामुळे चिडलेल्या पत्रकारांनी थेट पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या कार्यालयात जात गोल्डेंना योग्य ती समज देण्याची मागणी केली.

डीवायएसपी विश्वांभर गोल्डे आणि पत्रकारांमध्ये बाचाबाची होण्याचे यापुर्वी देखील अनेक प्रसंग घडले आहेत.

मात्र प्रत्येकवेळी पत्रकारांनी समजुतीने घेत गोल्डे यांच्या मुजोर वागण्याकडे दुर्लक्ष केले. मात्र पालकमंत्री अजितदादा पवार बीडच्या जिल्हा नियोजनाची बैठक आटोपून जात असताना सर्व पत्रकार अजितदादांच्या ताफ्याकडे त्यांचा बाईट घेण्यासाठी जात होते.

मात्र डीवायएसपी गोल्डे यांनी पत्रकारांना रोखण्याचा प्रयत्न केला.रोखण्याबाबत पत्रकारांना काहीच आपत्ती नव्हती. मात्र गोल्डे यांनी ज्या प्रकारे मुजोरपणाची भाषा वापरली त्यावर पत्रकारांनी आक्षेप घेतला.

यावेळी त्यांच्यात आणि पत्रकारांमध्ये बाचाबाची देखील झाली. यानंतर सर्व पत्रकारांनी पोलीस अधीक्षक कार्यालय गाठत गोल्डेंविरोधात लेखी तक्रार देत त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करून त्यांना पत्रकारांसोबत व्यवस्थित वर्तन ठेवण्याबाबत समज देण्याची मागणी केली.

शिवाय डीवायएसपी गोल्डे पत्रकारांबद्दल आपल्या मनात पुर्वग्रह दुषित ठेवून अशाप्रकारचे वर्तन करीत आहेत, त्यांचा नक्की प्रॉब्लेम काय? हे एकदा पत्रकारांना कळू द्या,

अशी मागणी देखील पत्रकारांनी केली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी पत्रकारांच्या भावना पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांना कळविल्या.

त्यानंतर काँवत यांनी यापुढे जिथे कुठे बंदोबस्ताचा विषय येईल, जिथे कुठे पब्लिक आणि पत्रकारांचा विषय येईल तिथे गोल्डे यांना बंदोबस्ताची जबाबदारी न देण्याचा निर्णय घेतला असल्याचे पत्रकारांना कळविले.

गोल्डे यांच्या मुजोरपणाचे पत्रकारांना आलेले अनुभव
1) प्रजासत्ताक दिनादिवशीच्या ध्वजारोहनावेळी पोलीस मुख्यालयावर विश्वांभर गोल्डे यांनी पत्रकाराला विनाकारण धक्काबुक्की करीत, दाबदडब करीत त्याला अरेरावी केली.

2) संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात आरोपींना न्यायालयात ने-आण केली जात असताना डीवायएसपी गोल्डे प्रत्येकवेळी पत्रकारांना अरेरावी करतात. त्यांना वार्तांकन करण्यापासून रोखतात. पत्रकार म्हणजे एखादा अतिरेकी आहे अशा प्रकारचे वर्तन त्यांच्यासोबत करतात.

3) ज्ञानराधा प्रकरणात वार्तांकन करणार्‍या अनेक पत्रकारांना डीवायएसपी गोल्डे यांनी असभ्य भाषा वापरत तेव्हाही वार्तांकन करण्यापासून रोखण्याचा प्रकार केला.

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!