क्राईमबीड

मेसालयाच्या आडुण वेश्यालय चालवणाऱ्या मुळुकांचा खरा चेहरा आला समोर

The raid on the brothel in Beed began near the residence of the police superintendent, while the naked men were still naked.

पोलीस अधिक्षकांच्या निवासस्थाना पासुण जवळच असलेल्या मुळुक यांच्या घरात सुरु होता नंगानाच ! मेस च्या नावाखाली सुरु होता महिला परोसण्याचा धंदा ! मुळुक दांपत्याच्या काळ्या धंद्याचा पर्दाफाश

“वेश्या व्यवसायावर AHTU व LCB पथकाचा छापा”

वेगवान मराठी प्रतिनिधी- केशव डी मुंडे बीड आज दिनांक 24/02/2025 रोजी शिवाजी नगर येथे सह्याद्री हॉटेलचे विरुद्ध दिशेचे गल्लीत हॉटेल किनारा जवळ एक इसम मेसचे नावा खाली त्याची पत्नी व एक खाजगी इसम यांचे मदतीने त्याचे राहते घरात महीलांना बोलवुन वैश्या व्यवसाय करत असल्याची माहिती बीडच्या AHTU पथकाला मिळाली त्यावरून AHTU पथकाच्या प्रभारी अधिकारी वर्षा व्हगाडे यांनी ही माहीती वरीष्ठांना दिली.

मा. पोलीस अधीक्षक यांनी LCB चे पोलीस निरीक्षक संतोष घोडके व AHTU पथकास आदेश दिल्या-नंतर रेडचे नियोजन करण्यात आले. त्यावरून दोन पंच व AHTU स्टाफ, डमी ग्राहक हे शिवाजीनगर नगर येथे आले व तेथे डमी ग्राहकाने थुंकून इशारा करताच पथकाने रेड मारली.

त्यावेळी तेथून बीड जिल्हयातील तीन व पुणे जिल्हयातील १ महीला अशा चार महीला मिळून आल्या.

तसेच आरोपी राजेंद्र प्रभाकर मुळूक वय-५०, त्याची पत्नी ज्योती राजेंद्र मुळुक वय-35, दोघेही राहणार शिवाजी नगर व खाजगी इसम उमेश सुनिलकुमार पारीख रा. जालना रोड, बीड यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन शिवाजी नगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरील कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विश्र्वांबर गोल्डे यांचे मार्गदर्शना खाली

पोलीस निरीक्षक संतोष घोडके, AHTU पथकाच्या API वर्षा व्हगाडे, महीला अंमलदार शोभा जाधव, अनिता दगडखैर, दिपा सावंत, शालीनी उबाळे, अनिता खरमारे मनिजा खरमाटे, सविता सोनवणे, पुरूष अंमलदार अशोक शिंदे, संजय सुरवसे सुभाष पवार यांनी केली

संबंधित दोन पुरुष आरोपी व 2 महीला आरोपी यांचे विरुद्ध पोलीस ठाणे शिवाजी नगर येथे अनैतिक मानवी प्रतिबंध अधिनियम कायदया अन्यये सरकार तर्फे, API वर्षा व्हगाडे यांनी फिर्यादी होवुन गुन्हा दाखल केला आहे.

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!