राजस्थानीचा चंदु लाला परभणी पोलीसांनी उचलला !
Parbhani police arrest Chandu Biyani! Rajasthani remanded in 3-day custody in multi-state kidnapping case

परळी वैजनाथ येथील राजस्थानी मल्टिस्टेट क्रेडिट सोसायटीचा अध्यक्ष चंदुलाल बियाणी चे पाय आणखी खोलात , परभणी पोलीसांनी चंदु लाला उचलला !
वेगवान मराठी परळी वैजनाथ प्रतिनिधी- दिनांक 27 फेब्रुवारी 2025 परभणी : ग्राहकांची फसवणूक केल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने सेलू पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात राजस्थान मल्टिस्टेटचे अध्यक्ष चंदुलाल बियाणीस बीड कारागृहातून सेलू पोलिसांनी मंगळवारी ताब्यात घेतले.
300 कोटीच्या घोटाळ्यातील राजस्थानी मल्टिस्टेट चा अध्यक्ष चंदुलाल बियाणी ला बुधवारी परभणी जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
मुदत संपूनही पैसे परत दिले नसल्याने अभय सुभेदार (रा.सेलू जि.परभणी ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून न्यायालयाच्या आदेशाने १० फेब्रुवारीला सेलू पोलिस ठाण्यात राजस्थानी मल्टिस्टेट क्रेडिट सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष चंदुलाल बियाणी, उपाध्यक्ष बालचंद लोढा, सचिव बद्रीनारायण बाहेती, सहसचिव पी. डी. अग्रवाल, कोषाध्यक्ष विजय प्रकाश लड्डा, सेलू येथील शाखाधिकारी नंदकिशोर सोमाणी अशा सहा जणांवर गुन्हा दाखल केला होता.
पोलीस निरीक्षक दीपक बोरसे, सपोनि. प्रभाकर कवाळे यांनी तपासादरम्यान अध्यक्ष चंदुलाल बियाणी हे अंबाजोगाई येथील एका ग्राहक फसवणूक गुन्ह्यात बीड येथील कारागृहात असल्याचे पुढे आले.
आरोपी चंदुलाल बियाणीला २५ फेब्रुवारीला बीड कारागृहातून ताब्यात घेत अटक केली.राजस्थानी मल्टिस्टेट आर्थिक गैरव्यवहार व ठेवीदारांच्या फसवणुक प्रकरणी बुधवारी जिल्हा सत्र न्यायालयात हजार केले असता, न्या. जी. जी. भरणे यांनी आरोपीला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
( चौकट )
लाखो ठेविदारांच्या जिवणाचे मातेरे करुण फरार झालेल्या राजस्थानी मल्टिस्टेट च्या संचालक मंडळा चा मोहरक्या मल्टिस्टेट चा अध्यक्ष चंदु बियाणी फरार होणारा आणि अटक होणारा देखील पहिला आरोपी आहे…
चंदु बियाणी यानीच इतर संचालक आणि कर्मचाऱ्यांना फरार होण्यास सांगीतले, परंतु चंदु चा लाल अभिषक बियाणी पोलीसांच्या जाळ्यात सापडला आणि पोराला बाहेर काढण्यासाठी पुत्रप्रेमापोटी चंदु स्वताहुण बीड पोलीसांना शरण आला
दरम्यान आता चंदु ला बाहेर पडण्यासाठी मल्टिस्टेट चा कोषाध्यक्ष बद्रिनारायण बाहेती त्याची बायको,विजयप्रकाश लड्डा आणि त्याच्या बायकोसह मल्टिस्टेट चा व्यवस्थापक कुलकर्णी यांची अटक होणे आवश्यक आहे याशिवाय चंदु चे बाहेर पडणे मुश्किल हि नही नामुमकीन है…
परंतु बद्रिनारायण बाहेती हा भयानक विचित्र प्राणी निघाला आहे त्यांने चंदु बियाणी ला तर वेठीस धरलेच आहे परंतु ठेवीदारांच्या ठेवीतुन वाटप केलेले कर्ज,एफडी स्वरुपातील ठेवी व मालमता मातीमोल किमती मध्ये हाडपण्याचा सपाटा,बाहेर राहुण हाडपण्याचा सपाटा सुरू ठेवला आहे …
यामध्यें त्याला चंदु बियाणी चा भाऊ जगदीश बियाणी पोरगी पुजा बियाणी, विजय लढा,आणि त्याची बायको,गंगाखेडचा बंडु मुंढे व त्याची फैमीली आणि इतर काही त्याचे संबंधित व दलाली करणारे संधीसाधु सहकार्य करत आहेत ….
दरम्यान परळी ठेवीदार कृती समिती यांच्या हालचालींवर बारकाईणे लक्ष्य ठेवुण आहे,या संदर्भात भाजपाचे आमदार सुरेश आण्णा धस यांनी दोन दिवसापुर्वी परळी येथे ठेवीदारांची सभा लावली होती
यावेळी त्यांनी प्रशासकीय पातळीवर आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या कडे मी हा विषय मांडुण ठेवीदारांना न्याय मिळवुण देणार आसल्याचे सांगीतले आसुण या घोटाळ्यात जे कोणी सामील आसतील त्यांना सज्जा दिल्या शिवाय गप्प बसणार नसल्याचे सांगीतले आसुण यामुळे अनेकांचे धाबे दणानले आहेत

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.