क्राईम

केज बनले गुन्हेगारीचे माहेरघर मर्डर,खंडणी,अपहरण,गांजा,आणि चंदन तस्करी नंतर अफु लागवड

MP's home pitch has become a haven for crime. What exactly does MLA Namita Mundada do?

बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे आणि नमिता मुंदडा यांचे होमपिच असलेला केज मतदार संघ बनलाय गुन्हेगारीचे माहेरघर….

वेगवान मराठी प्रतिनिधी बीड दिनांक -26 फेब्रुवारी 2025 केज तालुक्यातील घटणा पाहता बीडचे खासदार इतर घटणांवर थेट बोट ठेऊण गुंडगिरी आणि दहशतीवर सातत्याने आरडा ओरड करताना पाहण्यात येतात.परंतु मागील काही काळा पासुण केज तालुक्यात चंदन तस्करीचे प्रकार उघडकीस आले एवढेच नाही तर यामध्ये बजरंग सोनवणे यांचा चंदन तस्करी मध्ये सहभाग आसल्याचे देखील आरोप झाले…

पुढे चालुन खंडणी,मर्डर,गांजाची लागवड,त्या नंतर आवाधा कंपनीच्या अधिकाऱ्याचे अपहरण आणि काही दिवसांपूर्वी खुद बजरंग सोनवणे यांच्या कारखाण्यातील कर्मचाऱ्यांणी केलेले दोन ऊसतोड मुकादमांचे अपहरण ताजे असतानाच आता कळंब आंबा येथील शेतकरी ऊत्तम मस्के यांनी कांद्याच्या पिकात अफुची लागवड केल्याची धक्कादायक घटना पोलीसांनी उघडकीस आणली आहे…

हा सर्व घटणाक्रम पाहता लोकप्रतिनिधी म्हणुन खासदार आणि आमदार नेमके करतात काय आसा प्रश्न उपस्थित होतो, बजरंग सोनवणे आणि नमिता मुंदडा यांचे होमपिच असलेला केज तालुका गुन्हेगारी चे माहेरघर बनला आसुण याचे समुळ उच्चाटन करण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनासह संबंधित लोकप्रतिनिधींची देखील तेवढीच आसुन सदरील गुन्हेगारीला कोणाचे पाठबळ तर नाही ना आसा सवाल सामान्य नागरीकांसह जिल्हावाशीयांना सतावत आहे

याबाबत अधिक माहिती अशी की कळंब अंबा येथील शेतकरी उत्तम रंगनाथ मस्के या शेतकऱ्याने शेतात कांद्याची लागवड केलेली आहे.

याच कांदा पिकात अफू पिकाची देखील लागवड केली. या संदर्भात युसुफ वडगाव पोलिसांना गुप्त माहिती मिळाली या माहिती आधारे पोलिसांनी सोमवारी उत्तम मस्के यांच्या शेतात धाड टाकली असता अफूची झाड मिळून आली.

या कारवाईत पोलिसांनी साडेचार किलो अफु जप्त केला. या अफुची किंमत 1 लाख 72 हजार रुपये इतकी आहे.

या प्रकरणी उत्तम मस्के यास पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई नायब तहसीलदार आशा वाघ, पोलीस निरीक्षक शेंडगे, सय्यद अमजद, शिनगारे, घोरपडे, महादेव, राऊत, डोंगरे, चालक गायकवाड यांनी केली आहे…

वेगवान मराठी बीड -केशव डी मुंडे- (जाहिराती साठी संपर्क-8888 387 622 )

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!