बीड

परळीसह बीड जिल्ह्यात चलान वसुलीची पोलिसांची संयुक्तिक मोहिम

Challan recovery drive by Transport Department Police in many places in Beed district

आज बीड पोलीस वाहतुक शाखा व बीड पोलीस यांनी संयुक्तपणे बीड जिल्ह्यातल्या विविध ठिकाणी वाहन चलान वसुलीची मोहिम राबवण्यात आली

वेगवान मराठी परळी बीड- प्रतिनिधी – आज दिनांक 27 /2/2025 रोजी माननीय पोलीस अधीक्षक सर यांच्या आदेशाने व माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर सर व श्रीमती चेतना तिडके मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व सर्व ठाणे प्रभारी अधिकारी यांनी

तसेच वाहतूक शाखा आरसीपी यांनी संयुक्तरीत्या जिल्हाभरातील या ठिकाणी चलान वसुलीची मोहिम राबवली आहे

पाडळसिंगी टोल ,नाका केज टोलनाका, चुंबळी फाटा ,धारूर टोल नाका, बर्दापूर टोल नाका,

माजलगाव परभणी टी पॉइंट ,इतके कॉर्नर परळी, अंभोरा चेक पोस्ट इत्यादी ठिकाणी वाहतूक चलानवसुलीचे मोहीम राबवून 1028 चलनाचे 820550( आठ लाख वीस हजार पाचशे पन्नास) रुपये रोख वसूल करण्यात आले

व 237 केसेस करून एक लाख 47 हजार दंड आकारण्यात आला.

मा. पोलीस अधीक्षक श्री. नवनीत कॉवत यांचे आदेशाप्रमाणे व मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर, यांचे निगराणीखाली

आज दिनांक 27/02/2025 रोजी बीड जिल्हयामध्ये एकुण 8 ठिकाणी .1 पाडळसिगी टोलनाका 2. केज टोलनाका 3. बर्दापुर टोलनाका 4. धारुर टोलनाका

5. परळी इंटके कॉर्नर 6. माजलगांव परभणी टी- पॉईंट 7. चुंबळी फाटा 8. अंभोरा चेक पोस्ट येथे विशेष महा नाकाबंदी नेमुण नाकाबंदी करीता पो. स्टे प्रभारी अधिकारी व पो. स्टेचे दुय्यम अधीकरी

तसेच पोलीस स्टेशन येथिल वाहतुक अंमलदार, वाहतूक शाखेचे अधिकारी अंमलदार तसेच RCP पथक HSP गेवराई येथील वाहतुक अंमलदार यांनी संयुक्त कारवाई करुन मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणा-या वाहन चालकाविरुध्द 237 कसेस करुन 1,41,400/-/-रु दंड आकरण्यात आला आहे.

तसेच वाहनावरील प्रलंबित दंड 1028 केसेसचा 8,20,550/-रु दंड वसुल करण्याची कारवाई केली.

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!