
बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्याने लढवली अफलातुन शक्ल आणि अत्यंत दुर्गम भागात फुलवला अफुचा मळा! !
वेगवान मराठी प्रतिनिधी बीड –दिनांक 1 मार्च 2025 -बीड जिल्हयाची भौगोलीक स्थिती आणि निसर्गाचा लहरीपणा यामुळे डोंगराळ भागातील शेतकऱ्यां पुढे कौटोंबिक गरजा पूर्ण करण्यासाठी कायम त्रेधातिरपीट उडत आसते,यातुनच काहीजनांना जिवघेण्या अती कष्टाचा मार्ग निवडावा लागतो तर काहीजन या गरजा पूर्ण करण्यासाठी शार्टकट म्हणुन चुकिच्या वाटेवर जाताना दिसतात. …
दिनांक 01/03/2026 रोजी 18. 10 वाजण्याचे सुमारास आरोपी नामे रामहरी कारभारी तिडके वय 42 वर्षे रा पिंपरवडा ता. धारूर जि. बीड त्याचा मालकीचे शेत गट नं 33 मध्ये मौजे पिंपरवाडा ता धारूर जि. बीड येथेमिळालेल्या गोपनीय माहिती प्रमाणे छापा टाकला असता
यातील आरोपी
त्याचे मालकीचे शेत गट नं 33 मधील शेतात अफु या अंमली पदार्थच्या झाडाची बेकायदेशीर विनापरवाना व्यापा व्यावसायीक विक्रीच्या उद्देशाने लागवड करुन अंमली पदार्थ अफुची पांढरी शुभ्र फुले व त्यास गोलाकार बोंड असलेली हिरवी व पिंपळसर पाने असलेली झाडे मुळासह ज्याना 42 गोन्यामध्ये टाकुन त्याचे वजन केले असता गोन्यासह एकून वजन 540 किलो 759 ग्रॅम येवढे असुन प्रती किलो 80,000/- रूपये प्रमाणे त्याची एकूण किंमत 4,32,60,720/- रूपये किंमत अंदाजे अंमली पदार्थ अफूच्या झाडा
लागवड करुन स्वताच्या आर्थिक फायद्यासाठी संगोपन करत असताना मिळुन आला म्हणुन त्याचे विरुध्द पोलीस स्टेशन धारूर गु र न 57/2025 गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परीणाम करणारे पदार्थ अधिनीयम 1985 चे
कलम 8 (b), 15, 18 प्रमाणे गुन्हा दाखल करुन करण्यात आला आहेत.
सदरची कामिगरी ही मा.श्री.नवनीत काँवत पोलीस अधीक्षक बीड, मा. सचिन पांडकर अपोअ बीड, मा. श्रीमती चेतना तीडके अपोअ अंबाजोगाई यांचे मार्गदर्शनाखाली पो. नि .उस्मान शेख. स.पो. नि . विजयसिंग जोनवाल, पो.उप. नि.महेश विघ्ने ग्रेड.पो.उप. नि .हनुमानखेडकर, पो. ह तुषार गायकवाड ,महेश जोगदंड, भागवत शेलार, पोअ. बप्पासाहेब घोडके ,asi संजय जयभाये सर्व नेमणूक स्था.गु.शा.बीड स.पो.नी देविदास वाघमोडे ,asi भुसारी व धारूर पोलिस स्टेशन येथील स्टाफ यांनी मिळून केली आहे.
मागील 13 वर्षापुर्वी परळी तालुक्यातील ग्रामीण भागात देखील मोठ्या क्षेत्रफळावर शेतकऱ्यांनी अफुची लागवड केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती ! तर अलिकडेच काही शेतकऱ्यांंनी कापसामध्ये आणि तुरीच्या पट्यांमध्ये गांजाची लागवड केल्याचे आढळुन आले होते…
असाच काहीसा प्रकार बीड जिल्ह्यातल्या धारुर तालुक्यातील चोंडी तसेच जहांगीर या गावांच्या केंद्रस्थानी आसलेल्या पिंपरवाडा या गावातील शिवारातील अत्यंत दुर्गम व डोंगराळ ठिकाणी रामहरी तिडके नावाच्या शेतकर्याने अफलातुन शक्ल लढवत चक्क अफूची शेती पिकवली आहे.
याबाबतची माहिती एलसीबी बीड पोलीस यांना प्राप्त झाल्यानंतर पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत यांनी नेमलेल्या पथकाने तीन अधिकार्यांसह 12 पोलीस कर्मचारी यांना घेऊन दुपारी बारा वाजल्यापासून या ठिकाणी कार्यवाही सुरू केलेली होती.
तेंव्हा कुठं सायंकाळी सहा वाजता या पथकास तीन गुंठे क्षेत्रफळावर अफू ची लागवड केल्याचे आढळुन आले आसता सदरील अफु उपटून घेण्यास सुरुवात केली अफू उपटून घेतल्यानंतर त्याचं जे एकुण मोजमाप होणार आसुण सदरील माल किती लाखाचा मुद्देमाल पकडला याबाबत पोलिसांकडून सविस्तर माहिती दिली जाईल असं सांगण्यात येत आहे.
तत्पूर्वी धारूर तालुक्यात अफूची शेती आढळून आल्याने एकच खळबळ उडाली या अफूच्या माध्यमातून नशेखोरांना नशा करण्यास अफूचा उपयोग होतो आणि त्यासाठीच नशेखोर अफूचा उपयोग करून घेतात.
पिंपरवाडा येथील शेतकरी रामहरी तिडके यांनी शेततळे खोदून त्याच्याद्वारे अफूला पाणीपुरवठा करत अतिशय दुर्गम भागात जिथे सहज जाणं शक्य नाही अशा ठिकाणी अफूची शेती पिकवली आहे.अफू पिकवणे कायद्याने निर्बंध घातलेले असताना रामहरी कारभारी तिडके या शेतकर्याने अफूची शेती पिकवल्यामुळे पिंपरवाडा गाव चर्चेत आले आहे.
धारुर तालुक्यातील बालाघाट पर्वत रांगांमध्ये वसलेल्या पिंपरवाडा गावाच्या शिवारात जहागीरमोहा पिंपरवाडा आणि चोंडी या तीन गावांच्या केंद्रस्थानी असलेल्या अतिशय दुर्गम भागात शेततळ्याच्या माध्यमातून तीन गुंठे जमीन ओलिता खालील क्षेत्रफळावर रामहरी कारभारी तिडके या शेतकर्याने अफू पिकवला आहे.
दरम्यान सदरील कार्यवाही धारुर पोलीसांसह एलसीबी बीड यांच्याकडुण करण्यात आली आहे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.