धर्मवीर संभाजी व छत्रपती शिवाजी महाराजांवर गरळ ओकणाऱ्याचा परळीत निषेध
Protest in Parli against those who spat on Chhatrapati Shivaji Maharaj and Dharmavir Sambhaji Maharaj

छत्रपती शिवरायांबद्दल विषारी गरळ ओकणा-या प्रशांत कोरडकरला परळीत जोडो मारो आंदोलन
असामाजीक वृतीच्या विकृति महाराष्ट्रात वारंवार महापुरुषांच्यावर बरळत आहेत यामुळे सामाजीक सलोखा बिघडत आसुण प्रशासणाने याची गंभीर दखल घेऊण आशा मनोवृत्तीचा नांगा वेळीच ठेचला पाहीजे -सेवकराम जाधव यांचे प्रतिपादन
वेगवान मराठी -परळी वैजनाथ प्रतिनिधी केशव डी मुंडे .दिनांक 28 फेब्रुवारी 2025- ज्या छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराजांमुळे अखंड हिंदुस्तानी जनताच नव्हे तर मंदीरे,आणि मंदिरातील देवांचे देखील संतक्षण झाले ! ज्यांच्या असण्यामुळे आज आपण स्वतः चे अस्तीत्व टिकवुण आहोत त्या महापुरुषांच्या बद्दल काही मनोरुग्ण वृतीचे नालायक लोक्स वाटेल तसे बरळुण सामाजीक सलोखा बिघडवत आसतील
आणि हिंदु धर्मियांसह तमाम शिवप्रेमींच्या भावनांशी खेळत आसतील तर स्वतःला हिंदु धर्माचे पाईक म्हणुन घेणाऱ्या आणि देवेंद्र फडणवीस,नरेंद्र मोदींसह गल्ली ते दिल्ली सत्तेमध्ये असलेल्या भारतीय जनता पक्षाने या विषयी मुग गिळुण दातखिळी लावुण बसणे याला काय समजायचे ? आसा प्रश्न उपस्थित होतो !
छत्रपती शिवाजी आणि धर्मवीर संभाजी महाराज की जय आसा उच्चार जरी केला तरी समस्त भारतीयांच्या अंगावर काटा उभा राहतो ! छावा सारखा चित्रपट पाहत आसताना थिअटर मध्ये लहान थोरांसह औरंग्याला पाहुण अक्रोष आणि संभाजी महाराजांचा धर्मासाठी व स्वराज्यासाठी त्याग आणि बलिदान पाहुण अश्रुंचा महापुर वाहतो
आशा देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या महापुरुषांच्या बद्दल अपमानजनक वक्तव्य करणाऱ्या विकृती आपल्याच महाराष्ट्रात जन्माला याव्यात हे खुप मोठे दुर्दैव्य आहे.. 👇
रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल विषारी गरळ ओकणा-या जातीयवादी प्रशांत कोरडकरच्या विरोधात परळीत जोरदार निदर्शने करण्यात आली. त्याच्या प्रतिमेस आंदोलकांनी जोडे मारून त्याचा जाहीर निषेध केला व राज्य सरकारने कोरडकरवर कडक कारवाई करण्याची मागणी केली.
याबाबत अधिक माहिती अशी की प्रसिद्ध इतिहासकार इंद्रजीत सावंत यांच्याशी मोबाईल वरून बोलत असताना जातीयवादी प्रवृत्तीच्या प्रशांत कोरडकर याने महाराष्ट्राची अस्मिता असलेले रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल अतिशय अपमानास्पद वक्तव्य केली या वक्तव्याचा महाराष्ट्र सह देशभर सर्वत्र निषेध होत आहे तसेच कोरडकरच्या विरोधात शिवप्रेमी रस्त्यावर उतरले आहेत.
परळी वैजनाथ येथे आज दिनांक 28 फेब्रुवारी रोजी शिवप्रेमी तसेच आंबेडकर प्रेमी नागरिकांच्या वतीने सकाळी 11 वाजता राणी लक्ष्मीबाई टॉवर येथे जातीवादी प्रशांत कोरडकर च्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली तसेच त्याच्या प्रतिमेला आंदोलकांनी चप्पल व बुट मारून जाहीर निषेध केला
तसेच राज्य सरकारने अशा प्रवृत्तींना ठेचून काढले पाहिजे अशा प्रकारची मागणी केली व फुले, शाहू, आंबेडकरांचा महाराष्ट्र महापुरुषांचा अपमान कदापिही सहन करणार नाही असा कडक इशारा देण्यात आला.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते उत्तम माने, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते लुगडे महाराज, सामाजिक कार्यकर्ते अनंत इंगळे, ज्येष्ठ पत्रकार रानबा गायकवाड,
सामाजिक कार्यकर्ते सेवकराम जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते बाबा शिंदे,नितीन राव शिंदे, शिवाजीराव देशमुख, बालाजी काळे, मनसेचे तालुकाध्यक्ष श्रीकांत पाथरकर ,
प्राचार्य प्रा. अतुल दुबे,शहराध्यक्ष वैजनाथ कळसकर, दिनेशजी गजमल,केशव साबळे पाटील, एकतावादी रिपाईचे शहराध्यक्ष सुनील कांबळे,
वेगवान मराठी चे उप संपादक पत्रकार केशवराव मुंडे, भागवत साबळे, ज्येष्ठ नेते मुक्ताराम गवळी, महबूब कुरेशी, हरिभाऊ बुरकुले, पत्रकार निवृत्ती खाटीक, हनुमंत माने, भगवानराव काकडे आदी उपस्थित होते.

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.