
जिजाऊ माँसाहेब मल्टीस्टेट को.ऑप क्रेडीट सो. लि. बीड चे विरूद्ध दाखल गुन्हयातील मुख्य आरोपी बवन विश्वनाच शिंदे यास गुन्हयात अटक करून तपासादरम्यान सदर मल्टीस्टेटची मुख्य शाखा व धोंडीपुरा शाखेतील तिजोरीतून 22,27,420/- रूपये मुद्देमाल जप्त..
वेगवान मराठी बीड प्रतिनिधी दि.5 मार्च 2025 – जिजाऊ मौसाहेब मल्टीस्टेट को. ऑप क्रेडीट सो.लि. बीड च्या एकूण चार शाखा असुन सदर वित्तय संस्थेचे मुख्य प्रवर्तक, चेअरमन, वाईस चेअरमन, संचालक मंडळ, अधिकारी कर्मचारी यांचे विरूद्ध बीड जिल्हयात तीन व धाराशिव जिल्हयात दोन असे पाच गुन्हे दाखल असून त्यामध्ये 167 कोटी रूपयेचा विम्वसाघात करून अपहार झालेबाबत तपासात निष्पन्न झालेले आहे.
व सदर मल्टीस्टेट विरुद्ध दाखल गुन्हयातील ठेवीदार व अपहारीत रक्कमेमध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. जिजाऊ माँसाहेब मल्टीस्टेट को. ऑप क्रेडीट सो.लि. बोड चा मुख्य प्रवर्तक बबन विश्वनाथ शिंदे याचे विरुद्ध गुन्हा दाखल झ शालेपासून सुमारे एक वर्षापर्यंत तो आपली वेशभूषा बदलुन मोबाईलचे सिमकार्ड बदलुन दिल्ली, नेपाळ, आसाम, उत्तर प्रदेश, ओरिसा, चंदीगड इत्यादी राज्यात आपले अस्तीत्व लपवुन राहत होता.
त्यास पाच महिन्यापूवी आधिक गुन्हे शाखा, बोड येथील पथकाने वृदावन (मथुरा) उ.प्रदेश येवून ताब्यात घेवून अटक केरलेले होते.
सदर आरोपी विरुद्ध विविध दाखल गुन्हयात त्यास अटक करून तपास करण्यात आलेला आहे. त्याचे विरूद पोस्टे शिवाजीनगर गुरनं-493/2023 कलम-420,406,409,120 (ब) भादवि सह कलम-3,4 एमपीआयडी अॅक्ट 1999 प्रमाणे दाखल गुन्हयात त्यास दि.03/03/2025 रोजी अटक करून त्याची मा. न्यायालयाने दि. 10/03/2025 पावेतो पीसीआर मंजूर केल्याने त्यास दि.04/03/2025 रोजी सोबत घेवून जिजाऊ मौसाहेब मल्टीस्टेट को. ऑप क्रेडीट सो.लि. बीड शाखा धोंडीपुरा येथे असलेल्या लॉकरचा ठेवीदार व पंच याचे समक्ष पंचनाम केला असता त्याशाखेतील तिजोरीतून नगदी 29,080/- रूपये रोख रक्कम व 4,59,040/- रूपये सोन्याचे दागीने असे एकूण-4,88,120/- रूपये (अक्षरी चार लाख अनुयाऐंशी हजार एकशे वीस रूपये) चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जिजाऊ माँसाहेब मल्टीस्टेट को. ऑप क्रेडीट सो.लि. बीड ची मुख्य शाखा बीड येथे असलेल्या लॉकरचा ठेवीदार व पंच पाचे समक्ष पंचनाम केला असता त्याशाखेतील तिजोरीतून 17,39,300/- रूपये किमतीचे
सोन्याचे दागीने असा दोन्ही शाखेतून एकूण 22.27.420/- रूपये (अक्षरी बावीस लाख सत्तावीस हजार चारशे बोस रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर मल्टीस्टेट चे मुख्य प्रवर्तक, चेअरमन, संचालक मंडळ यांचे स्थावर व जंगम मालमत्तेबाबतचा एमपीआयडी प्रस्ताव शासनास पाठवण्यात आला होता. त्याबाबत शासनाने वरील आरोपीतांच्या मालमत्तेबाबत मा.राज्यपाल महोदय यांचे नावाने व सहीने अधिसुचना जारी केलेली असुन त्यामध्ये सक्षम प्राधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी, बीड यांची नेमणुक करण्यात आलेली आहे.
सदरची कामगिरी मा. विरेंद्र मिश्र विशेष पोलीस महानिरीक्षक छ. संभाजी नगर परीक्षेत्र, छ. संभाजीनगर, मा. नवनीत काँवत, पोलीस अधीक्षक बीड, मा. सचिन पांडकर, अपर पोलीस अधीक्षक बीड, विश्वांवर गोल्डे उपविपोअ बीड तथा पोलीस उप अधीक्षक आर्थिक गुन्हे शाखा बीड यांचे मार्गदर्शनाखाली
आर्थिक गुन्हे शाखा येथील पोनि. संतोष, सपोनी पांडुरंग, सफी-मुकुंद-1194, विष्णु-971, मच्छीद्र-1160 पोह. विठठल-1343 पोलीस अंमलदार, संजय- 2292 यांनी केलेली आहे.

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.