
वेगवान मराठी प्रतिनिधी पुणे दिनांक-5 मार्च 2025 दौंड– या प्रकरणातील पोलिसां कडुण मिळालेल्या प्राप्त माहिती नुसार, पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील वरवंड आणि कडेठाण गावच्या शिवेवर असलेल्या कडेठाण सीमेच्या शिवारा मध्ये 7 डिसेंबर 2024 ला शेतात काम करणाऱ्या लताबाई बबन धावडे यांच्यावर बिबट्यानं हल्ला केला होता आसा बनाव करुण गाव कऱ्यांसह पोलीसांना वेड्यात काढण्याचे काम आरोपी अनिल धावडे आणि त्याच्या साथीदाराने मिळुण केले होते.
त्या महिलेला उसाच्या शेतात बिबट्याने फरफटत घेऊण गेल्याचे प्रथमदर्शनी पोलिसांना देखील वाटले होते परंतु पुढे तिन महिण्यां नंतर आलेल्या अहवाला नंतर पोलीसांना अनिल धावडे हा खोटे बोलल्याचा संशय आला आणि कसुण चौकशी अंती व गुप्त माहितीच्या आधारे या दोघांमध्ये अनैतिक संबध आसल्याचे उघडकीस आले
सदरील हल्ल्यात लता धावडे यांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचा दावा त्यावेळी तक्रारदार पुतण्या अनिल पोपट धावडे यांनी तक्रारी मध्ये केला होता.
पोलीस आणि वन विभागाचे जबाबदार अधिकारी घटनास्थळी दाखल होण्यापूर्वीच त्यांचा मृतदेह घटनास्थळावरुन हलवला गेला होता.
तर वन विभागाने हा वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला नसल्याची शंका व्यक्त पूर्वीच केली होती.
मृत महिलेच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करुन वन विभागाच्या नागपूरमधील प्रादेशिक न्याय वैज्ञानिक संस्थे मध्ये वन्यप्राण्यामुळे मृत्यु झाला नसल्याचे उघडकीस आले आणि आरोपीचे बिंग फुटले…

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.