क्राईमबीड

मल्टिस्टेटच्या दारात गळफास लावून शिक्षकाची आत्महत्या

Teacher from KEG commits suicide by hanging herself from the door of the institution's multi-state

[वेगवान मराठी प्रतिनीधी केशव डी मुंडे बीड 15/03,/2025-/9:49 am] : सदरील मयत हा  केळगाव येथील कायम विनाअनुदानित आश्रम शाळेमध्ये शिक्षक आहे. 2019 मध्ये राज्य सरकारने 20 टक्के अनुदान घोषित करण्यात आले होते. मात्र त्याची अंमलबजावणी झालीच नाही.

गेल्या अनेक वर्षापासून शिक्षक म्हणून काम करत असताना धनंजय अभिमान नागरगोजे यास अनेक अडचणीस सामोर जावं लागल्याचे बोललं जात आहे

आज रोजी या शिक्षकाने बीड येथील त्याच संस्थाचालकाच्या कृष्णा मल्टिस्टेट बैंकेच्या प्रांगणात इमारतीच्या इंगलला फास लाऊण आत्महत्या केल्याचे प्रथम दर्शनी दिसत आहे

दरम्यान आसे आसले तरी मयत धनंजय नागरगोजे याचे पाय हे पुरते जमीनीला टेकलेले होते आणि वर बांधलेला फास देखील दुसऱ्या व्यकतींकडुण बांधला आसावा आसा दिसुण येत होता यावरुण धनंजय नागरगोजे यांची आत्महत्या नसुण घातपात आहे की काय याची शक्यता वर्तवली जात आहे

: ज्या शाळेवर हा शिक्षक कार्यरत होता.त्याच संचालकाची ही कृष्णा अर्बन बॅक आसुण बँकेच्या दारात गळफास घेतल्याची चर्चा ऐकण्यास मिळत आहे.

दरम्यान पोलीस तपास आणि शवविच्छेदन अहवाल आल्यावरच घटणेचे सत्य समोर येईल याबद्दलचे अधिकृत अपडेट्स येणे बाकी आहे

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!