क्राईमबीड

फेसबुक वर भावनीक पोस्ट करत चिमुकलीची माफी मागुण पित्याची आत्महत्या

Father commits suicide by posting sentiments in the name of little girl on Facebook

श्रावणी बाळा तुझ्या बापूला शक्य झालंच तर माफकर, मी माफी मागायच्या पण लायकीचा नाही.

वेगवान मराठी प्रतीनिधी बीड -केशव डी मुंडे 15 मार्च 2025 बीड केज तालुक्यातील केळगाव येथील धनंजय अभिमान नागरगोजे या विना अनुदानित शाळेवरील शिक्षकाने फेसबुक वर खालील पोस्ट करुण संबंधीत संस्थाचालकाच्या मल्टीस्टेट बैंकेच्या प्रांगणात आत्महत्या केली आहे 👇

बाळा तुझ्या बाबतीत मी खूप स्वप्न पहितली होती पण त्या स्वणाना स्वप्नातच ग्रहण लागले काय करू माझ्या मनात कधी स्वार्थ आलाच नाही .कधी मी कुणाला दोन रू ला फसवल नाही किंवा कुणाचं कर्ज पण घेतल नाही .
श्रावणी बाळा शक्य झालंच तर कर एकदा तुझ्या बापूला माफ कारण तुला मी एकट्याला सोडून जात आहे .

तुला आजुन काही कळत नाही तुझ वय आहेच किती, तीन वर्षे तुला काय कळणार ज्यांना कळायला पाहिजे त्यांना बापू कधी कळला नाही.बाळा बापूंनी कधीच कुणाचं नुकसान केलं नाही सर्वांसोबत चांगला वागला

पण या नालायक राक्षस लोकांनी माझा अंधारातून खूप छळ लावला आहे. विक्रम बाबुराव मुंडे
,विजय विक्रम मुंडे
अतूल विक्रम मुंडे
आणि
त्यांचे कार्य करते
उमेश रमेश मुंडे
गोविंद नवनाथ आव्हाड
ज्ञानेश्र्वर रजेभाऊ मुरकुटे

या सर्वांनी माझा खूप छळ लावला आहे मला, हे
हाल हाल करून मरणार आहेत
मला मारण्याचं करणं म्हणजे मी फक्त विचारलं होत की ,मी तुमच्या शाळेवर गेली 18 वर्षे झालं काम करतोय अजून मला
पगार नाही

आता पुढे काय करायचं त्यावर विक्रम बप्पा म्हणले तू फाशी घे म्हणजे तू मोकळा आणि मी पण दुसरा तुझ्या जागेवर कर्मचारी भरायला मोकळा हे एकूण माझ्या पाया खालची जमीनच सरकली
आणि तीतून पुढे या लोकांनी मला त्रास देण्यास सूर्वात केली

श्रावणी बाळा हे सर्व राक्षस आहेत या राक्षसा मुळेच मी तुझ्या पासून दूर जात आहे.
तुला एकदा पाहण्याची माझी खूप इच्छा होती पण मी एक दळभद्री बाप तुझ्या वाट्याला आलो.
काय करू माझ्यापाशी कोणता पर्याय या लोकांणी ठेवला नाही .

बाळा डोळ्यातलं पाणी थांबत नाही. पण त्याग केल्या शिवाय पर्याय नाही
श्रावणी मला माफ कर माफी मागण्याच्या पण लयकीचो नाही मी

तरी पण शक्य झालं जेव्हा तुला कळेल तेंव्हा माफ कर आता मी थांबतो खूप त्रास होतोय मला
विक्रम बाबुराव मुंडे
विजयकांत विक्रम मुंडे
अतूल विक्रम मुंडे
उमेश रमेश मुंडे
ज्ञानेश्वर राजेभाउ मुरकुटे
गोविंद (अमोल) नवनाथ आव्हाड

हे सर्व मझ्या माझ्या आत्महत्येला कारणीभूत आहेत .कारण यांनी मला खूप त्रास दिला आहे यांच्या मुळेच मी माझे जीवन संपवित आहे

आत्ता पर्यंत मी कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मोठ्या मनानी माफ करावे.

सर्वांना माझा शेवटचा राम राम …

जाहीराती साठी संपर्क वेगवान मराठी 8888 387 622 

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!