आरोग्यबीडमहाराष्ट्र

बीडसह मराठवाड्यातील ऊसतोड कामगारांच्या संदर्भात शासणाचा मोठा निर्णय

Government's big decision regarding sugarcane harvesting workers in Marathwada

मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातील ऊस तोडणी कामगारांसाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभागातील अधिका-यांचा समावेश करून विकास व सहाय्य समिती स्थापन करावी.

वेगवान मराठी प्रतिनिधी 17 मार्च 2025 ऊसतोड कामगार असलेल्या महिलांच्या बाबतीत पाच वर्षापुर्वी धकादायक माहिती सामाजीक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थानी उघडकीस आणली होती त्या बाबतीत सरकारणे एक समीती गठीत केली होती त्या समितीने आपला अहवाल सादर केला आसुण ऊस तोडणी कामगारांसाठी शासनाच्या सर्व योजना एकाच प्लॅटफॉर्मवर देता येतील यासाठी एक ॲप तयार करावे अशा सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दिल्या आहेत

विधानभवनात विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली बीड जिल्ह्यातील गर्भाशय काढून टाकण्याच्या शस्त्रक्रियांसंदर्भात गठित समिती अहवाल – मंत्रालयीन विभागाने केलेल्या कार्यवाहीबाबत बैठक झाली.

यावेळी ट्रॅकिंग सिस्टीम, रेशनची पोर्टिबिलिटी यांसारख्या अत्याधुनिक यंत्रणेच्या सहाय्याने योजना राबवण्यावर भर द्यावा.

बीड जिल्ह्याप्रमाणे इतर जिल्ह्यातही काम करावे.

अपघातग्रस्त ऊस तोडणी कामगारांना तात्काळ मदत देण्यात यावी अशा सूचना उपसभापती डॉ.गोऱ्हे यांनी केल्या.

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!