
बीड जिल्हात गोली मार भेजे मे चा प्रकार थांबता थांबेना झालाय झ्याकी आणि चमकी पैटर्ण चे फैड तरुणाईला भुरळ घालताना दिसतय ! वास्तव स्वीकारण्या ऐवजी आभाशी विश्वात स्वप्न रंगवणारी युवा पिढी वाया जाती की काय आसा प्रश्न बीड जिल्ह्यात निर्माण झालाय !
वेगवान मराठी प्रतिनिधी बीड दि.18 मार्च 2025 या संदर्भात माहिती अशी की दिनांक १४ मार्च धुलीवंदनाच्या दिवशी नाथापूर येथील रवि राधेशाम वक्ते यांच्या शेतात जेवणाची पार्टी आयोजित केली होती.
त्यावेळी रवि वक्ते याने त्याच्या साथीदाराकडील गावठी पिस्तुलातून हवेत गोळीबार केल्याची माहिती पिंपळनेर पोलिसांना मिळाली.
त्यानुसार अजय अण्णासाहेब साबळे (रा.शिदोड), रवि राधेशाम वक्ते, महादेव सर्जेराव चव्हाण यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली.
रवि वक्ते याने अजय साबळे यांच्याकडील गावठी पिस्तुल घेऊन त्यातून एक राऊंड हवेत फायर केल्याबाबत कबुली दिली.
गुन्ह्यात वापरलेले गावठी पिस्टल अजय अण्णासाहेब साबळे(रा. शिदोड) यांच्या घरी असल्याचे सांगितले. त्यानुसार शिदोड येथे जाऊन पंचासमक्ष अजय साबळे यांच्या घरातून ५० हजार रुपये किंमतीचे गावठी पिस्तुल जप्त केले.
सदर प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र परवाना अधिनियम व कलम १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पिंपळनेर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी मधुसूदन घुगे करत आहेत.

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.