पद्म पुरस्कारांचे नामांकने सादर करण्याचे गृह विभागाचे आवाहन
Appeal to apply to the Central Home Department for the Padma Bhushan award

पद्म पुरस्कार वर्ष 2026 साठी नामांकने सादर करण्याचे आवाहन-अंतिम तारीख 31 जुलै 2025
वेगवान मराठी प्रतिनिधी नवी दिल्ली, दि.18 मार्च 2025 : दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला प्रतिष्ठित अशा पद्म पुरस्कारांची घोषणा होत असते. पद्म पुरस्कारांची नामांकने केंद्रीय गृह मंत्रालयाने सादर करण्याचे आवाहन केले असून याबाबत प्रक्रिया 15 मार्च 2025 पासून प्रारंभ झाली आहे.
नामांकने सादर करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2025 आहे. पद्म पुरस्कारांसाठीचे नामांकने (https://awards.gov.in). या राष्ट्रीय पुरस्कार पोर्टवर ऑनलाईन सादर केली जातील.
देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांमध्ये पद्मविभूषण, पद्मभूषण, आणि पद्मश्री याचा समावेश होत असून हे पुरस्कार कला, साहित्य, शिक्षण, क्रीडा, आरोग्य, सामाजिक कार्य, विज्ञान, अभियांत्रिकी, सार्वजनिक सेवा, नागरी सेवा, व्यापार आणि औद्योगिकी अशा विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरीसाठी प्रदान केले जातात. प्रत्येक भारतीय नागरिक या पुरस्कारांसाठी पात्र आहेत.
सरकार सर्व नागरिकांना स्वत:चे नामांकन करण्यासाठी आणि इतर योग्य व्यक्तींच्या शिफारसी सादर करण्याचे आवाहन करते,
विशेषत: स्त्रिया, समाजातील दुर्बल घटक, अनुसूचित जाती-जमाती, दिव्यांग, आणि निस्वार्थ सेवा देणाऱ्या व्यक्तींच्या शोधासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन यामाध्यमातून करण्यात आले आहे.
नामांकन सादर करताना, व्यक्तीच्या उल्लेखनीय कार्याची माहिती 800 शब्दांपर्यंतच्या वर्णनात नमूद करणे आवश्यक असल्याचे गृह मंत्रालयाने त्यांच्या बातमी पत्रात म्हटले आहे.
यासंबंधी अधिक माहिती केंद्रीय गृह मंत्रालयाच्या (https://mha.gov.in) संकेतस्थळावर तसेच पद्म पुरस्काराच्या पोर्टलवर (https://padmaawards.gov.in) उपलब्ध आहे.
DY.DIRECTOR (INF) Government of Maharashtra |
MAHARASHTRA INFORMATION CENTRE A/8 State Emporium Building, Baba Kharak Singh Marg, New Delhi 110001 India Phone: 011-23363773 Mobile: 011-23367830 Email: micnewdelhi@gmail.com/ srad5ms.dgipr-mh@nic.in Website: dgipr.maharashtra.gov.in/ |

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.