ठेवीदार कृती समिती परळी कडुण प्रेस नोट जारी
Press note issued by Parli Depositor Action Committee

राजस्थानी मल्टीस्टेट प्रकरणी परळीत अशांतता निर्माण करण्यास जबाबदार कोण ? चोर सोडून संन्याशाला फाशी देणार का?ठेवीदारांना न्याय मिळालाच पाहिजे.
वेगवान मराठी प्रतिनिधी परळी वैजनाथ दिनांक 27 मार्च 2025 .. परळी वैजनाथ येथील पोतदार इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापकाने ठेवीदारांना दिलेला शब्द बदलून उलट ठेवीदारांना धमकी दिल्याचे समजले. तसेच मुख्याध्यापकास मारहाण झाल्याची बातमी समोर आली. सदसत् विवेक बुद्धीने विचार केल्यास पुढील काही कारणामुळे असे प्रकार घडत असल्याचे दिसून येते.
परळी वैजनाथ येथील राजस्थानी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुख्य शाखा परळी वैजनाथ आणि इतर सुमारे 40 शाखा एक वर्षापासून बंद आहेत.
राजस्थानी मल्टीस्टेट आणि राजस्थानी पतसंस्था चे अध्यक्ष चंदुलाल बियाणी व त्यांचे संचालक मंडळ आणि प्रमुख अधिकारी यांनी संगणमत करून ठेवीदारांच्या सुमारे 300 कोटींच्या ठेवी हडप करून फरार आहेत. खरंतर ही संघटित गुन्हेगारी आहे.
यांच्यावर मराठवाड्यात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झालेले आहेत. पहिला गुन्हा लातूर येथे तर दुसरा गुन्हा परळी वैजनाथ येथे दाखल झाला. 24 मे 2024 रोजी परळी वैजनाथ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 074 दाखल झालेला आहे. 142 ठेवीदारांनी हा गुन्हा दाखल केलेला असून नंतर यांची संख्या दोनशेच्या वर गेलेली आहे.
पोदार लर्निंग इंग्लिश स्कूल राजस्थानी मल्टीस्टेटच्या संचालकांच्या मालकीची असून ठेवीदारांचा पैसा तिथे वापरलेला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्यास सुमारे एक महिना घेतला होता. ठेवीदारांनी पोलीस ठाण्यात रात्रभर ठिय्या मांडल्यानंतर 24 मे 2024 रोजी पहाटे तीनच्या सुमारास एफ आय आर दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ का झाली हे अद्याप समजलेले नाही.
सुमारे दहा महिने होत आहेत. पोलीस प्रशासनाने एकाही आरोपीस अटक केली नाही. कारण अध्यक्ष चंदुलाल बियाणी स्वतःहून कोर्टात शरण आलेला आहे. इतर आरोपी संचालक व प्रमुख अधिकारी आरोपी मोकाट आहेत. यांना अटक करण्याच्या हालचाली अद्याप तरी दिसत नाहीत.
अध्यक्ष चंदुलाल लाजला व स्वतः अटक झाला कोर्टात शरण आलेला आहे. अद्याप इतर एकाही संचालकाला पोलीस प्रशासन अटक करू शकले नाही आश्चर्य वाटते. पोलीस प्रशासनाच्या वेळ काढू धोरणामुळे संचालकांनी त्यांच्या प्रॉपर्टी विक्रीचे किंवा हस्तांतरण करण्याचे नियोजन केले त्यांना भरपूर वेळ मिळाला. यामुळे ठेवीदारांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे.
राजस्थानी मल्टीस्टेटवर अद्याप प्रशासक आलेला नाही. आरोपी संचालकांना अद्याप अटक झालेली नाही. फरार आरोपींचे व्यवसाय धंदे राजरोस सुरू आहेत.
उदाहरणार्थ पोदार लर्निंग इंग्लिश स्कूल आणि मराठवाडा साथी वर्तमानपत्र. ठेवीदार देशोधडीला लागले परंतु याची खंत शासन व प्रशासनाला नाही कारण त्यांनी हे प्रकरण अद्याप गांभीर्याने घेतलेले दिसत नाही. ठेवीदारांनी उपोषण, आमरण उपोषण, मोर्चे, निवेदने, अर्ज विनंती हे सर्व प्रकार अवलंबिलेले आहेत हे विसरता येणार नाही.
परंतु या प्रकरणकडे जाणून बुजून दुर्लक्ष होत आहे असे म्हणण्यास पुष्कळ वाव आहे. उशिरा दिलेला न्याय सुद्धा अन्यायच असतो. ठेवीदारांना न्याय न देता आरोपींना सहकार्य करणे म्हणजे माणुसकीला कलंक लावण्यासारखे आहे.
आता तरी या प्रकरणात बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच माननीय जिल्हाधिकारी आणि माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी तातडीने लक्ष घालून आवश्यक कार्यवाही करून ठेवीदारांना न्याय द्यावा एवढीच एक ठेवीदारांची या देशाचे नागरिक म्हणून मागणी असून न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे.
चौकट
राजस्थानी मल्टिस्टेट प्रकरणा नंतर चंदुलाल बियाणी फरार , लागोपाठपाठ बद्रिनारायण बाहेती जयप्रकाश लड्डा आसे एक एक करुण सगळेच परळी सोडुण फरार झाले
यानंतर ठेवीदारांनी कृती समिती स्थापन केली ! संचालक मंडळाच्या घरादारा सह उधोगधंद्यानां ठेवीदारांनी प्रशासणास कुलुप लावण्यास भाग पाडले
अपवाद होते राजस्थानी पोद्दार स्कुल आणि कारण होते परळीतील मुलाबाळांचे भविष्य
ठेवीदार कृती समिती आणि पोद्दार स्कुल च्या व्यवस्थापक आणि प्रिंसिपल यांच्यात बैठक
शाळेचा एकुण एक खर्च आणि कर्मचाऱ्यांचे वेतन करूण उर्वरित रक्कम मल्टिस्टेट वर प्रशासक लागे पर्यंत शाळेतील खात्यात जमा करायाची आणि मार्च महिण्यात ठेवीदार कृती समिती ला हिशोब देण्याचा सर्वानुमते ठराव
शाळेत ठेवीदार सोडुण व्यवस्थापक ,संचालक,कर्मचारी यांच्या सोबत प्रिंसिपल बीपी सींग यांचे सतत वाद , हाणामारी,शिवीगाळ,आणि गुन्हे दाखल होण्या पर्यंत मजल
वरील सर्व घटणेत सत्य असत्य स्थानीक,परप्रांतीय आसा भेदभाव न करता विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये या हेतूने ठेवीदार कृती समिती प्रिंसिपल बीपी सींग याच्या पाठीशी राहीली
परंतु हिशोब देण्याची वेळ आली तेंव्हा धनंजय मुंडे आणि कुटुंबीयांचे नावे सांगत ठेवीदारां मध्ये दहशत पसरवण्याचे बीपी सींग करतोय प्रयत्न
बीपी सींग याचे याच शाळेतील शिक्षकीपेशाला काळीमा फासण्याचे कारणामे समोर येत आहेत तर शाळेतील आर्थिक व्यवहारात देखील मोठी अफरातफर करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे
दुसरीकडे बिपी सिंग हा फरार आरोपींच्या संपर्कात आसुण त्यांना सहकार्य करत आहे ठेवीदार कृती समिती बिपी सिंग याला मल्टिस्टेट प्रकरणात सह आरोपी करावा आशी मागणी करणार आहे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.