
बीड जिल्ह्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे ! हाणामारी आणि अवैध धंदे करणाऱ्यांवर नवनीत कॉवत यांनी लक्ष् केंद्रित केले आसले तरी या घटणांचे प्रमाण कमी होण्या ऐवजी वरचेवर वाढतानां दिसत आहे. …
वेगवान मराठी बीड(प्रतिनीधी) दिनांक 27 मार्च 2025 बीड शहरातील बार्शी नाका परिसरात हिना पेट्रोल पंप समोरील भागात शुल्लक कारणावरून वाद झाला.या वादातून दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली. या भांडणात धारदार शस्त्रांचा वापर करण्यात आला असून, यामध्ये तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
त्यांच्यावर सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक असून त्यांना संभाजीनगर येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले.
प्राथमिक माहितीनुसार, या वादाची सुरुवात लहान मुलांच्या भांडणातून शुल्लक कारणावरून झाले. कालचा झालेला वाद आज मिटवण्यासाठी दोन्ही गट दुपारी समोरासमोर बसले.
परंतु वाद मिटण्याऐवजी तो अधिक चिघळला आणि अखेर हाणामारीत परिवर्तित झाला.एका गटाने दुसऱ्या घरावर हल्ला चढवला या हल्ल्यात कोयता, तलवार धारदार शस्त्रांचा वापर करूत हल्ला करण्यात आल्याची सांगण्यात येत आहे
. यामध्ये १) मोमीन अन्सार अब्दुल सत्तार,२)मोमीन मुजाहिद अब्दुल सत्तार ३) मोमीन शहबाज मोमीन हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. हे सर्वजण बार्शी नाका, हिना पेट्रोल पंप परिसरातील रहिवासी आहेत.यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे
पुढील उपचारासाठी संभाजीनगर येथे हलवण्यात आले.या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत,
या हाणामारीत सहभागी असलेल्या आरोपींचा शोध घेतला जात आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
या हल्ल्याची माहिती मिळताच बीड शासकीय रुग्णालयामध्ये जखमी ना पाहण्यासाठी गर्दी झाली होती.

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.