क्राईम

संतोष देशमुख यांच्या मस्साजोग येथील मोठी अपडेट

Robbers at Awada Company in Massajog finally arrested

14/04/2025

आवादा कंपनीचे पवन चक्की मध्ये दरोडा टाकुन कॉपर वापर चोरी करणारी टोळी स्था.गु.शा.वीड ने उघड करुन 04 आरोपी केले गजाआड

वेगवान मराठी प्रतिनिधी केशव डी मुंडे बीड- मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्दयी हत्याकांडा मुळे चर्चेत आलेल्या आवादा कंपणीत दिनांक 07/04/2025 रोजी रात्री 11.45 सुमारास विडा शिवारात आवादा कंपनीने अधिगृहण केलेले WPG48 या पॉईटवर पवणचक्कीचे इस्टोलेशनचे काम सुरु असलेल्या ठिकाणी कंपनीचे दोन सेक्युरीटी कार्ड यांना चौदा अज्ञात आरोपीतांनी हातपाय बांधुन त्यांना मारहाण करुन पवणचक्कीचे कॉपर केबल कटरच्या सहायाने कापुण एकुण 12,87,800/-रु चे कॉपर केबल चोरी केले केल्याची घटना घडली होती

त्यावरून फिर्यादी नामे आकाश भास्कर जाधव व्य. वॉचमन आवादा कंपनी यांनी दिलेल्या फिर्याद वरुन दिनांक 08/04/2025 रोजी पो.स्टे. केज येथे गु.र.नं. 145/2025 कलम 310(02) भारतीय न्याय संहिता 2023 अन्वये गुन्हयाची नोंद झाली होती.

सदर गुन्हयाचे अनुषंगाने आरोपीचा शोध घेवुन अटक करण्यासाठी मा. पोलीस अधीक्षक, बीड यांच्या सुचना पोलीस निरीक्षक श्री. उस्मान शेख स्थागुशा बीड यांना दिल्या होत्या.

त्या अनुषंगाने पोनि श्री. उस्मान शेख यांनी आपल्या अधिपत्याखातीत सपोनि जोनवाल, पोउपनि विघ्ने व पथकातील अंमलदार यांना सदरचा गुन्हा उघडकीस आणुन आरोपी शोध घेण्यासाठी सुचना दिल्पा

त्यावरुन स्था.गु.शा. पथकाने दिनांक 14/04/2025 रोजी सदर गुन्हयाचे विश्लेषण करुन गोपनिय बातमीदाराचे माहितीने गुन्हयात वापरलेली महेंद्रा बुलेरो गाडीची टोफोग्राफी वरुन माहिती प्राप्त करुन अज्ञात आरोपीतांचा शोध घेवुन एकुण 10 आरोपी निष्पन्न करण्यात आले आहे.

त्यापैकी 1) बबन सरदार शिंदे रा. नांदूर ता.केज, 2) धनाजी रावजी काळे रा. लक्ष्मी पारधीवस्ती जि.धाराशिव, 3) मोहन हरि काळे रा. रा. लक्ष्मी पारधीवस्ती जि.धाराशिव, 4) तालासाहेब सखाराम पवार रा. दसमेगाव ता. वाशी, जि. धाराशिव यांना स्था.गु. शा. पथकाने ताब्यात घेतले असुन त्यांचेकडुन एकुण 11,58,500/- रु चा मुद्देमाल व गुन्हयात वापरलेली बुलेरो वाहन जप्त करण्यात आलेले आहे.

सदर आरोपीतांचे चौकशी दरम्यान त्यांनी बीड जिल्हयात खातील प्रमाणे गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे.

1) पो.स्टे. केज येथे गुर.नं. 145/2025 कलम 310 (02) भा.न्या.सं.पवनचक्की कॉपर वायर दरोडा

2) पो.स्टे. नेकनुर गुरनं 11/2025 कलम 303 (02) भा.न्या.सं.ट्रॉन्सफर कॉपर वायर चोरी

3) पो.स्टे.केज गुरनं 110/2025 कलम 334 (01) भा.न्या.सं.

कॉपर वायर चोरी पवनचक्की कॉपर वायर चोरी

4) पो.स्टे. पाटोदा गुरनं 359/2024 कलम 303 (02),324(4), (5) भा.न्या.सं. सदर आरोपी हे अभिलेखावरील मालाविरुध्दचे व शरिराविरुध्दचे एकुण 27 गुन्हे दाखल असून ते एकत्र येवुन संघटीत

होवुन गुन्हे करण्याचे सवयीचे असल्याने त्यांचेवर मकोका कायदा अन्वये कारवाई करण्यात येणार आहे.

सदरची कामगिरी ही मा. नवनीत काँवत पोलीस अधीक्षक बीड, मा.अपर पोलीस अधीक्षक, बीड व पो.नि. श्री. उस्मान शेख यांचे मार्गदर्शनाखाली

सपोनि विजयसिंह जोनवाल, पोउपनि महेश विभ्रे, ग्रे. पोउपनि हनुमान खेडकर, पोह/महेश जोगदंड, भागवत शेलार, तुषार गायकवाड, गणेश मराडे, पोशि/बाप्पासाहेब घोडके यांनी मिळून केलेली आहे.

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!