बीडचा वादग्रस्त पिएसआय रंजित कासले वर ठाणे येथे फसवणुकीचा गुन्हा दाखल
Case registered against suspended PSI Ranjit Kasle in Pen

वेगवान मराठी बीड प्रतिनिधी केशव डी मुंडे -दिनांक 15 एप्रिल २०२५ ठाणे_पेण पोलीस स्टेशन दिनांक : १४/०४/२०२५ प्रति,१) मा. पोलीस निरीक्षक साहेब,पेण पोलीस स्टेशन,ता. पेण, जि. रायगड.
अर्जदार:श्री. अदिनाथ महादेव पाटील रा. मु. चिंचपाडा पेण, ता. पेण, जि. रायगड.मो. नं. ८८०६७५०७८६
: विषय आरोपी श्री. रणजीत गंगाधर कासरे, वय ४० वर्ष, रा. २१/५६, बी विंग, रेल्वे पोलीस वसाहत, पंतनगर, घाटकोपर पूर्व, मुंबई, महाराष्ट्र ४०००७५ यांनी अर्जदारांच्या केलेल्या फसवणुकीबाबत त्यांच्याविरुध्द पेण पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्याबाबत.
महोदय,
अर्जदार हे पेण येथील स्थानिक रहीवासी आहेत. अर्जदार यांचे मित्र श्री. वामन माडये रा. बांद्रा, मुंबई (मो. ९२२४२२३५६५) येथे रहाणारे आहेत. श्री. वामन माडये यांचे आरोपी श्री. रणजीत गंगाधर कासरे (मो. ८०८००५३९३६, ) यांच्याशी मैत्रीचे संबंध असल्यामुळे अर्जदार यांची आरोपी श्री. रणजीत गंगाधर कासरे यांच्याशी ओळख झाली.
आरोपी श्री. रणजीत गंगाधर कासरे हे पोलीस डिपार्टमेंट मध्ये क्राईम ब्रँच विभागात कार्यरत आहेत अशी माहिती आरोपी यांनी अर्जदार व श्री. वामन माडये यांना दिलेली होती.
आरोपी यांनी माहे ऑक्टोबर २०२४ मध्ये अर्जदार व श्री. वामन माडये यांना असे सांगितले की, सायबर क्राईम गुन्हेगारांनी आरोपीची फसवणुक करुन त्यांच्या खात्यातील रक्कम काढून घेतलेली आहे
त्या गुन्हेगारांवर गुन्हा दाखल होऊन त्यांच्याकडून लवकरच आरोपीला पैसे मिळणार आहेत परंतु सायबर क्राईम गुन्हेगारांनी आरोपीची फसवणुक केल्यामुळे आरोपीला आर्थिक अडचण निर्माण झालेली आहे व आरोपीला
पैशांची अत्यंत आवश्यकता आहे. त्यानंतर आरोपीने अर्जदार व श्री. वामन माडये यांच्याकडे हातउसने म्हणून पैशांची मागणी केली त्यामुळे अर्जदार व श्री. वामन माडये यांनी आरोपीशी असलेले मैत्रीच्या संबंधांचा विचार करुन आरोपीला हातउसने म्हणून पैसे देण्याचे मान्य केले.
अर्जदार यांनी आरोपीला त्यांना शक्य झाले त्याप्रमाणे खालीलप्रमाणे रक्कम रुपये १,७०,०००/- (एक लाख सत्तर हजार रुपये) दिलेले आहेत
अ.क्र.बैंक/शाखा दिनांक स्वरुप रक्कम
बैंक ऑफ बडोदा, शाखा – पेण २९/१०/२०२४
आर.टी.जी.एस
५০,০০০/-
आय.डी.बी.आय. शाखा – पेण
०६/११/२०२४
बैंक ट्रान्सफर
(फोन पे अॅप)
५०,०००/-
आय.डी.बी.आय. शाखा पेण
०६/११/२०२४
बैंक ट्रान्सफर (फोन पे अॅप)
२५,०००/-
आय.डी.बी.आय. शाखा पेण
०७/११/२०२४ बैंक ट्रान्सफर
(फोन पे अॅप)
२५,०००/-
आय.डी.बी.आय.
११/११/२०२४
बैंक ट्रान्सफर
२०,०००/-
4)शाखा पेण(फोन पे अॅप)
अशाप्रकारे अर्जदाराने आरोपीला एकुण रक्कम १,७०,०००/- (अक्षरी एक लाख सत्तर हजार रुपये) दिलेले आहेत. वरील रक्कमेपैकी अर्जदाराने रक्कम रुपये ५०,०००/- (पन्नास हजार रुपये) मात्र आरोपीच्या सांगण्याप्रमाणे श्री. विनोद मुलजी पुपारेल यांच्या बँक खात्यात आर.टी.जी.एस. व्दारे जमा केलेली आहे. अर्जदाराप्रमाणे श्री. वामन मायडे यांनी देखील आरोपीला पैशांची मदत केलेली आहे.
अर्जदार व श्री. वामन मायडे यांनी त्यांच्या आर्थिक परिस्थितीप्रमाणे आरोपील याला हातउसने म्हणून पैसे दिले. परंतु त्यानंतर आरोपी अर्जदार यांच्याकडून अधिकाधिक पैशांची मागणी करु लागला. परंतु अर्जदार यांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे आरोपीला जास्त पैसे देणे शक्य झाले नाही.
आरोपी हा अर्जदाराला त्यांच्याकडून घेतलेली रक्कम तीन महीन्यांच्या मुदतीत परत करणार होता परंतु आरोपीने दिलेली मुदत निघून गेली
तरीही देखील आरोपीने अर्जदाराचे पैसे परत न दिल्यामुळे अर्जदाराने अरोपीकडे पैशांची मागणी केली असता आरोपी अर्जदाराचे पैसे देण्यास टाळाटाळ करु लागला.
त्यानंतर आरोपी अर्जदाराने केलेले फोन रिसीव्ह करण्यास व अर्जदारास भेटण्यास टाळाटाळ करु लागला.
अखेरीस अर्जदाराने आरोपीस वारंवार फोन केले असता आरोपीने अर्जदाराचा फोन रिसिव्ह केला व अर्जदारास धमकी दिली की, “मी तुझे पैसे परत देणार नाही तुला काय करायचे आहे ते कर, माझ्या नादी लागु नकोस नाहीतर मी तुला खोट्या गुन्हयात आडकवून तुला जन्मभर तुरुंगात खडी फोडायला पाठविन”.
आरोपीने अर्जदारास अशी धमकी दिल्यावर अर्जदाराला त्याची फसवणुक झाल्याची जाणीव झाली.
अर्जदाराने मैत्रीचे खातर आरोपीस रक्कम दिली परंतु आरोपीने अर्जदारास मुदतीत पैसे परत न दिल्यामुळे अर्जदारांचे खुप मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे.
आरोपीने अर्जदाराची घोर फसवणुक केलेली आहे त्यामुळे आरोपींच्या विरुध्द भारतीय दंडविधान संहीताचे कलम ४२० तसेच इतर कायद्यांच्या कलमांखाली गुन्हा नोंदवून त्यांच्या विरुध्द कडक कारवाई करण्यात यावी. ही विनंती.
अर्जदार श्री.अदिनाथ महादेव पाटील

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.